शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय चौकशीसाठी आरोपपत्र ठेवा; मुख्य प्रशासकाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

अकोटः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ लाखांचा अपहार प्रकरणातील आरोपी सचिव राजकुमार माळवेसह दोघेजण अद्याप फरार असून, ...

अकोटः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १६ लाखांचा अपहार प्रकरणातील आरोपी सचिव राजकुमार माळवेसह दोघेजण अद्याप फरार असून, माळवे यांना सचिवपदावरून तत्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच विभागीय चौकशीसाठी आरोपपत्र मुख्य प्रशासकांनी बजावावे, अशा मागणीचे पत्र माजी सभापती गजानन पुंडकर यांनी दिले आहे. आरोपी असलेल्या सचिवांना चौकशीच्या दृष्टीने पदावरून अद्याप हटविण्यात आले नसल्याने राज्य प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आरोपीची पाठराखण करीत असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अकोट येथील बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा उपनिबंधक पालेकर यांना दिलेल्या पत्रात सचिव राजकुमार माळवे व लेखापाल बोंद्रे यांच्यावर १६ लाख रुपयांची अफरातफर केल्याबाबतच्या लेखापरीक्षण अहवालानुसार पोलीस स्टेशन, अकोट येथे फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपी फरार असून, पोलीस शोध घेत आहेत. लेखापाल बोंद्रे यांना तत्कालीन संचालक मंडळाने निलंबित केले. मात्र, सचिव माळवे यांच्यावर समितीने कारवाई न करता सचिवाला अभय दिल्याचा आरोप होत आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत सचिव माळवे यांना तत्काळ निलंबित करून नमूद तक्रारीमधील प्रशासकीय व आर्थिक अशा गंभीर १८ प्रकरणांच्या विभागीय चौकशीचे आरोपपत्र प्रशासकांनी बजावावे, असे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे या पत्रासोबतच सन २०१४ - २०पर्यंतचे लेखा परीक्षण अहवाल व पोलीस एफआयआर जोडले आहेत. विभागीय चौकशी झाल्यास बाजार समितीमधील गंभीर प्रकार उजेडात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा गैरप्रकार उजेडात आल्यास अनेकांचे पितळ उघडे पडण्याच्या भीतीपोटी अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी सावधगिरीचा पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.