शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांच्या शाेधमाेहिमेला काेराेनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST

अकाेला- शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधमोहिमेद्वारे शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १ ते १० मार्चपर्यंत शाेधमाेहीम सुरू झाली आहे. ...

अकाेला- शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोधमोहिमेद्वारे शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने १ ते १० मार्चपर्यंत शाेधमाेहीम सुरू झाली आहे. मात्र, काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने तूर्तास ही माेहीम स्थगित करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघर्ष समितीने केली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियम- २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम १० मार्चपर्यंत राबिवण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ३ ते १८ वयोगटांमध्ये विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर असतील तर त्यांना या सर्वेक्षणामार्फत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या माेहिमेद्वारे प्रयत्न केले जातात. तीन ते सहा या वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमाेहीम अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने पार पाडण्यात येते. तर ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यामधील शिक्षकांच्या माध्यमातून सदर सर्वेक्षण पार पाडले जाते.

वाड्या, वस्त्या, घराेघरी जाऊन हे सर्वेक्षण करावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शोधमोहीम स्थगित करावी व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर शोधमोहीम राबवावी, अशी मागणी शिक्षक संघटना संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

शिक्षक संघटना म्हणतात...

जिल्हा परिषदेतील उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, दिव्यांग शिक्षक संघटना, शिक्षक परिषद प्राथमिक, शिक्षक आघाडी, प्रतिनिधी सभा, ॲक्शन फोर्स, आदिवासी विकास परिषद, केंद्रप्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना, स्वाभिमान शिक्षक संघटनेच्या समितीने ही माेहीम काेराेनाचा प्रभाव ओसरेपर्यंत स्थगित करण्याची मागणी केल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक राजेश देशमुख यांनी दिली.

दाेन वर्षांपूर्वी ३५० बालक हाेते शाळाबाह्य

दाेन वर्षांपूर्वी शाळाबाह्य सर्वेक्षण मोहीम राबिवण्यात आली हाेती. यावेळी शाळाबाह्य मुलांची संख्या ३५० हाेती. तसेच वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांची संख्या ३५ असल्याचे समाेर आले हाेते.

काेट

शाळाबाह्य मुलांच्या शाेधमाेहिमेसाठी पथक गठीत केले असून काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची काळजी घेऊनच प्रत्येक पंचायत समितीस्तरावर याबाबत नियाेजन करण्यात आले आहे. शिक्षक संघटनांनी माेहीम स्थगित करण्याबाबत पत्र दिलेेले आहे, त्यांच्याशीही चर्चा झाली आहे.

वैशाली ठग, शिक्षणाधिकारी अकाेला जिल्हा परिषद