शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

भुसावळ-नागपूर पॅसेंजरचा प्रवासही खुंटला

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

१0 जानेवारीपर्यंत धावणार केवळ बडनेरापर्यंत; एक्स्प्रेस गाड्यांना गर्दी वाढली.

अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रशासनाने ५१२८५/५१२८६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर १0 जानेवारीपर्यंत फक्त बडनेर्‍यापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळ प्रशासनाने शुक्रवारी घेतलेल्या या निर्णयामुळे या पॅसेंजर गाडीने प्रवास करणार्‍या प्रवाशांना १0 जानेवारीपर्यंत प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे. भुसावळ मंडळ प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी ५११८३/५११८४ भुसावळ-नरखेड-भुसावळ व ५११५१/५११५२ न्यू अमरावती-नरखेड-न्यू अमरावती या दोन गाड्या १ ते ७ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. नागपूर मंडळातसुद्धा रेल्वे रुळांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असल्याचे कारण स्पष्ट करीत मध्य रेल्वे प्रशासनाने ५१२८५/५१२८६ भुसावळ-नागपूर-भुसावळ पॅसेंजर गाडीसुद्धा १0 जानेवारीपर्यंत केवळ बडनेरा रेल्वे स्थानकापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अतिरिक्त मालगाड्यादेखील या मार्गावर चालविण्यात येणार असल्याचे मंडळ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. रेल्वे मार्गांची दुरुस्ती आणि अतिरिक्त मालगाड्यांची वाहतूक या परस्परविरोधी कारणांचे निटसे स्पष्टीकरण नसल्याने, केवळ पॅसेंजर गाड्या रद्द करून वा त्यांचे प्रवासाचे टप्पे कमी करून मध्य रेल्वे प्रशासनाला काय साध्य करावयाचे आहे, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. याबाबत इतर मंडळ अधिकार्‍यांना विचारणा केली असता, त्यांनीसुद्धा तिकीट विक्रीच्या माध्यमातून मंडळाला प्राप्त होणार्‍या महसुलावर विपरीत परिणाम होईल, असे सांगितले.

प्रवाशांची उडाली तारांबळ

     भुसावळवरून पहाटे ६ वाजता सुटणारी ५११८३ भुसावळ-नरखेड पॅसेंजर सकाळी ९.१६ वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचते. मात्र, शुक्रवारी सकाळी अमरावती आणि नरखेडकडे जाणार्‍या बहुतांश प्रवाशांना याची कल्पनाच नसल्याने अकोला रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. या गाडीने दररोज अप-डाऊन करणार्‍या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. ही स्थिती दुपारी ३ वाजता रेल्वे स्थानकावर पहावयास मिळाली. नरखेडवरून सकाळी ९ वाजता सुटणारी ५११८४ नरखेड-भुसावळ पॅसेंजर रद्द झाल्याने तारांबळ उडालेल्या प्रवाशांनी एक्स्प्रेस गाड्यांचा आधार घेतला.