शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

‘जलयुक्त’ची गती मंदावली!

By admin | Updated: May 16, 2017 01:55 IST

जलयुक्तची कामे लोकसहभागातून; निधी मुरला कुठे?

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोट तालुक्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे करण्यात आली असल्याचे संबंधित यंत्रणेने राज्य पातळीवरील मूल्यमापन समितीला कळविले होते. प्रत्यक्षात मात्र दोन वर्षांत अनुक्रमे १४८.०० लाख व ५४१.३६ लाख खर्च झाल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. त्यामुळे जलयुक्तमधून विविध कामांवर खर्च झालेल्या निधीचे आॅडिट करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसहभागातून कामे झाल्याचा गवगवा करण्यात आला, तर दुसरीकडे कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शासकीय निधीतून खर्च केलेल्या कोणत्याही कामात पाणी साठलेच नाही. त्यामुळे हा निधी मुरला कुठे, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अकोट तालुक्यात सन २०१५-१६ व २०१६-१७ या वर्षात विविध गावांची निवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्वच कामे लोकसहभागातून झाल्याचे दर्शविण्यात आले. लोकसहभागातून कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे अहवाल खुद्द अधिकाऱ्यांनी राज्य स्तर मूल्यमापन समितीसमोर सादर केले. त्यानंतर मात्र यावर्षी सन २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाबाबत माहिती घेतली असता, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ मध्ये २३ गावांची निवड करण्यात आली होती. या २३ गावांकरिता ७५९ कामे घेण्यात आली. त्यापैकी २४२ कामांना तांत्रिक मंजुरी मिळाली व १६१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. केवळ ११३ कामांवर १४८.०० लाख खर्च दाखविण्यात आला आहे. शिवाय, सन २०१५-१६ मध्ये ३५ गावे योजनेत सहभागी झाली होती. त्यांपैकी ३३ गावे जलयुक्त झाली आहेत. या ३३ गावांमध्ये २३५ पैकी २०४ कामे करण्यात आली असून, या कामांवर ५४१.३६ लाख रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. या योजनेला सन २०१५-१६ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. महसूल व कृषी विभागाने खोलीकरण व रुंदीकरणाची बहुतांश कामे करून अनेक गावे पाणीदार केली होती. विशेष म्हणजे, जलसंधारण व संवर्धनासाठी झपाटलेल्या गावकऱ्यांनी जल चळवळ उभी करीत मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून कामे केली होती. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी वाचेल, अशी अपेक्षा होती. सर्व कामे ही लोकसहभागातूनच झाली असल्याचा गवगवा केला असताना शासनाच्या दप्तरी मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याची आकडेमोड समोर आली आहे. त्यामुळे कोणती कामे लोकसहभागातून झाली व कोणत्या कामांवर शासकीय निधी खर्च करण्यात आला, याचे आॅडिट होऊन जलयुक्त शिवार योजनेमधील पारदर्शकता जनतेसमोर येणे गरजेचे झाले आहे. अकोट तालुका : १९ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ करिता अकोट तालुक्यात १९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पिंप्री खुर्द, खासबाग, सर्फाबाद, चोरवड खु., गोखी, बेलुरा, बोर्डी, शहानूर प्र. नरनाळा, रामापूर, कुंड, बोरी, मिर्झापूर, जऊळखेड बु., पुंडा, देवर्डा, टाकळी बु.,पळसोद, दिनोडा, गरसोळी या गावांचा समावेश आहे. या गावात शिवारफेरी घेऊन पाण्याचा ताळेबंद काढत गाव आराखडे जिल्हा समितीच्या मान्यतेकरिता १३ मेपर्यंत सादर करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत, तसेच सविस्तर अंदाजपत्रकांना २० मेपर्यंत प्रशासकीय मंजुरीस सादर करावे व त्यानंतर कामे सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे.