शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बँकेतील चोरीप्रकरणी आरोपींचा आंध्र प्रदेशात शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:07 IST

अकोला : गांधी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरदिवसा झालेल्या पाच लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी संशयावरून या चोरट्यांचा आंध्र प्रदेशात शोध सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे हे आंध्रातील असल्याचे स्पष्ट झाले असून, ते सदर गावातूनही फरार झाल्याची माहिती आहे; मात्र यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेला चोरटा हा आंध्रातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या गावातून या चोरट्याचे भाऊ व भावजय पसार झाल्याने पोलिसांना खाली हात परतावे लागले.

ठळक मुद्देकोतवाली पोलिसांनी सुरू केला आंध्र प्रदेशात चोरट्यांचा शोध सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेला चोरटा हा आंध्रातील असल्याचे निष्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गांधी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरदिवसा झालेल्या पाच लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी संशयावरून या चोरट्यांचा आंध्र प्रदेशात शोध सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे हे आंध्रातील असल्याचे स्पष्ट झाले असून, ते सदर गावातूनही फरार झाल्याची माहिती आहे; मात्र यामध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलेला चोरटा हा आंध्रातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या गावातून या चोरट्याचे भाऊ व भावजय पसार झाल्याने पोलिसांना खाली हात परतावे लागले. गांधी रोडवर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्व कर्मचारी नेहमीप्रमाणे बँकेच्या कामात व्यस्त असताना बँकेच्या इतर ग्राहकांसोबतच तीन व्यक्तीदेखील बँकेत पोहोचले. या तिघांनी बँकेतील कर्मचार्‍यांच्या काउंटरवर भेट देऊन कर्मचार्‍यांना व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी व अधिकारी व्यस्त असल्याचे निदर्शनास येताच त्यांचाच साथीदार असलेला चौथा व्यक्ती बँकेच्या आतमध्ये आला. त्याने थेट रोकड विभागात प्रवेश केला. रोकड विभागातील पाच लाख रुपयांची रोकड बॅगेत टाकू न पळ काढला. महाराष्ट्र बँकेच्या रोकड विभागात जाऊन त्यामधील पाच लाख रुपयांची रोकड घेऊन एक चोर सर्वांचे लक्ष चुकवून निघून गेल्याने एकाही बँक अधिकारी व कर्मचार्‍याच्या लक्षात न आल्याने पोलीसही अवाक् झाले होते. बँकेच्या व्यवस्थापकाने सिटी कोतवाली पोलिसांना या चोरीची माहिती दिली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये चार जणांनी चोरी केल्याचे दिसून आले. यामध्ये एका चोरट्याचा चेहरा स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय डहारे यांचे एक पथक आंध्र प्रदेशात गेले, त्या ठिकाणी सदर चोरट्याचे छायाचित्र दाखविले असता हा चोर त्या गावातील असल्याचे समोर आले; मात्र सदर चोरटा त्याचा भाऊ आणि भावजयसह गावातून पसार झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांना खाली हात परतावे लागले असून, या तिघांचा शोध आता नव्याने सुरू केला आहे.