शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपाताच्या किट्स विक्रीचा संशय असलेल्या एजन्सींची होणार चौकशी

By admin | Updated: December 1, 2014 00:27 IST

अकोला येथील दवा बाजारासह औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ.

अकोला : शासनाचे नियम, कायदे धाब्यावर बसवित गर्भपाताच्या औषधांची बिनबोभाट विक्री सुरू असल्याचे ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले आहे. त्यानंतर अकोल्यातील दवा बाजारात खळबळ उडाली असून, किरकोळ औषध विक्रेत्यांमध्येही धास्ती निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गर्भपाताच्या किट्स विकणार्‍या एजन्सींची आता वरिष्ठ स्तरावरून तपासणी करण्यात येणार असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे.शासनाने नियमावली ठरवून दिली, कायद्याचे बंधन घालून दिले, तरी बाजारात गर्भपाताची औषधे बिनबोभाट मिळतात. फक्त त्यासाठी मूळ किमतीच्या किमान दहापट रक्कम द्यावी लागते. सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवत गर्भपाताच्या औषधांचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणली. ३00 रुपयांची गर्भपाताची किट तीन-चार हजार रुपयांना कुठल्याही अडथळ्याविना विकली जात असल्याचेही समोर आले आहे. गर्भपाताच्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याने अवैध गर्भपात मोठय़ा प्रमाणात वाढले होते. त्यामुळे शासनाने गर्भपातासंबंधी औषधांच्या विक्रीसाठी ठोक औषध विक्रेता, किरकोळ औषध विक्रेता व डॉक्टरांसाठी नियमावली तयार केली होती. या नियमांच्या चौकटीतच गर्भपाताच्या औषधांची विक्री करण्याचे आदेश होते. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश अन्न व औषध प्रशासनाला दिले असले तरी या विभागाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे गर्भपाताच्या औषधांची खुलेआम, नियमबाहय़ विक्री जोरात सुरू असल्याचे उजेडात आले आहे. विना देयकाने औषधांची खरेदी करणे आणि या औषधांची विना देयकानेच विक्री करण्यात येत आहे. काही डॉक्टर व दवा बाजारातील औषध विक्रेत्यांनी गोरखधंदाच सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.