शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

हातरुण परिसरात अवैध वाळू वाहतूक

By admin | Updated: April 25, 2017 20:24 IST

हातरुण : परिसरात वाळूची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. अवैध वाळू वाहतूकविरोधात धडक मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हातरुण : परिसरात वाळूची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू आहे. यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. अवैध वाळू वाहतूकविरोधात धडक मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.बाळापूर तालुक्यातील हातरुण, निंबा फाटा, धामणा, सोनाळा, उमरी, आडसूल, अंदुरा, हाता, कंचनपूर, बादलापूर, लोणाग्रा, मालवाडा परिसरात रेतीची चोरटी वाहतूक सुरू असून, याकडे महसूल विभागाचा कानाडोळा होत आहे. बोरगाव वैराळे गावानजीक असलेल्या उमरी पेडावरून रेतीची उचल करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची वाहतूक करीत आहेत. परिसरात वाळू माफिया सक्रिय झाले असून, वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.वाळूची वाहतूक होत असलेल्या उमरी पेडाबाबत महसूल विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. एका ट्रॅक्टरची रॉयल्टी काढून त्याच रॉयल्टीवर दोन तीन वेळा वाळू वाहतूक केल्या जात आहे. रॉयल्टीची पाहणी करण्यास अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने वाळू माफियांचे फावले आहे. हातरुण येथील तलाठी कार्यालयासमोरून वाळूची वाहतूक सुरू असून, हातरुण तलाठी कार्यालय अनेक वेळा कुलूपबंद असते. वाळू वाहतुकीची वाहने परिसरातील गावातून सुसाट धावत असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीच्या त्रासाला नागरिक वैतागले असून, वाळूच्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. सध्या परिसरात घरकुल तसेच बांधकामे सुरू असून, त्यासाठी आवश्यक असणारी वाळू भरलेली ट्रॉली परिसरात २५०० ते ३००० रुपयांत विकले जात आहे. खुलेआम वाळू वाहतूक होत आहे. वाळूचा उपसा सुरूच असल्याने रेती घाटाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, या वाळू घाटाची पाहणी करून अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याची गरज आहे. वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी विठ्ठल वैराळे यांनी केली आहे.