शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित : खारोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST

तालुक्यातील उकळी बाजार येथील सेवा सहकारी संस्थेच्या नवीन कार्यालय व गोडाऊनचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्या नवीन इमारतीचा लोकार्पण ...

तालुक्यातील उकळी बाजार येथील सेवा सहकारी संस्थेच्या नवीन कार्यालय व गोडाऊनचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी उत्साहात पार पडला. यावेळी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका रूपालीताई संदीपराव खारोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष म्हणून तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य नयनाताई मनतकार, सहकारी जिनिंगचे माजी अध्यक्ष शांताराम काळे, बाजार समितीचे माजी सभापती संदीप खारोडे, सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष दामोदर मार्के, उकळी बाजारचे उपसरपंच शिवहरी काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष भाषणातून गावागावातील सेवा सहकारी संस्थांना जेवढी बळकटी मिळेल तेवढे शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपता येईल, असा विश्वास सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी व्यक्त केला. तसेच मंचावरील उपस्थित नयनाताई मनतकार, शांताराम काळे दामोदर मार्के, शिवहरी काळे, भास्करराव मार्के, संदीप पाटील खारोडे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सचिव डी. जी. गायगोळ यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुरेशराव ताथोड, विश्वासराव मार्के, प्रकाशराव कोकाटे, गजानन काळे, कुलदीप राऊत, श्रीकृष्ण वैतकार, रेखाताई घुंगड, प्रदीप ताथोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक श्रीकृष्ण वैतकार यांनी, तर संचालन बँकेचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक जी. टी. देऊळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन निरीक्षक स्वप्निल कराळे यांनी केले. संस्थेचे सचिव डी. जी. गायगोळ, कार्यालयीन सचिव ए. एस. ताथोड, निरीक्षक ए. एम. वानखडे, पी. एस. देशमुख, एम.एम. वानखडे सर्व गटसचिव व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.