शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

इच्छुक; आशा-निराशेच्या हिंदोळ्य़ावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 03:15 IST

अकोला महानगरपालिकेत राजकीय समीकरणांची चाचपणी सुरू.

अकोला, दि. 0७- महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली असता, विद्यमान नगरसेवक, राजकीय पक्षांचे महानगराध्यक्ष व इच्छुकांच्या गर्दीमुळे प्रमिलाताई ओक सभागृह गर्दीने खच्चून भरले होते. मनपा प्रशासनाने नियोजनबद्धरीत्या अवघ्या तासाभराच्या आत आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली. निवडणूक कोणतीही असो, राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जणू पर्वणीच ठरलेली असते. पक्षाच्या सतरंज्या झटकण्यात आयुष्य खर्ची करणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षाकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा असते.फेब्रुवारी २0१७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी (७ ऑक्टोबर) मनपा प्रशासनाने प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढली. स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षण काढल्या जाणार असल्याने सकाळपासूनच विद्यमान नगरसेवक, राजकीय पक्षांचे महानगराध्यक्ष तसेच इच्छुक उमेदवारांनी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. सभागृहात मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त सुरेश सोळसे, उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, जितकुमार शेजव व निवडणूक विभागाच्या कर्मचार्‍यांनी आरक्षण सोडतची प्रक्रिया पूर्ण केली. यंदाची निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. हद्दवाढीमुळे मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या भागाची हद्दवाढ व लोकसंख्येचे निकष लक्षात घेऊन प्रभागाची पुनर्रचना करण्यात आली. यामध्ये २0 प्रभाग निश्‍चित करण्यात आले असून, प्रत्येक प्रभागात चार याप्रमाणे ८0 नगरसेवक निवडून येतील. ८0 जागांसाठी शुक्रवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. महिलांसाठी ५0 टक्के आरक्षणानुसार ४0 जागांवर महिलांचे जातीनिहाय प्रवर्गानुसार आरक्षण निश्‍चित करण्यात आले. आरक्षणामुळे अनेकांच्या राजकीय समीकरणात उलथापालथ झाली असून, विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मनपाने केले नकाशे प्रसिद्धहद्दवाढीमुळे शहरालगतच्या २४ गावांचा मनपा क्षेत्रात समावेश झाला. प्रभागाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाल्याने प्रभाग पुनर्रचनेबद्दल अकोलेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मनपा प्रशासनाने आरक्षणाची सोडत काढल्यानंतर सभागृहाच्या बाहेर भिंतीवर प्रभाग पुनर्रचेनेचे नकाशे प्रसिद्ध केले. नकाशांमध्ये त्या-त्या भागाचा नावानिशी उल्लेख असल्याने डोकेदुखी कमी झाल्याचा सूर यावेळी उमटला.शहराची लोकसंख्या पाच लाखांच्या वर हद्दवाढीपूर्वी अकोला शहराची लोकसंख्या २0११ च्या जनगणनेनुसार ४ लाख २५ हजार ८१७ होती. शहरालगतच्या २४ गावांचा मनपात समावेश झाला असून, संबंधित भागाची लोकसंख्या १ लाख ११ हजार ३४0 च्या आसपास आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराची लोकसंख्या ५ लाख ३६ हजारांच्या घरात गेली असून, ८0 नगरसेवक महापालिकेत अकोलेकरांचे प्रतिनिधित्व करतील.युती,आघाडीसाठी मनधरणी!मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे प्रभागांच्या क्षेत्रफळात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदारांसमोर जाताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार हे निश्‍चित आहे. अशास्थितीत सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते युती किंवा आघाडी व्हावी, यासाठी पक्षाची मनधरणी करीत असल्याची माहिती आहे.