बार्शीटाकळी : शहरातील बोगस रेशनकार्डधारकांबद्दल संबंधित विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार शहरातील बोगस रेशनकार्डधारकांची चौकशी सुरू आहे; परंतु गत काही दिवसांपासून ही चौकशी थंडबस्त्यात पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बार्शीटाकळी शहरात अवैध रेशनकार्डधारकांची संख्या वाढत आहे. त्यानुसार काही संघटनांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकार्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तलाठी व लिपिक गत दोन महिन्यांपासून बोगस रेशनकार्डधारकांची चौकशी करीत आहेत. मात्र गत काही दिवसांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. अवैध रेशनकार्डधारकांच्या चौकशीला वेग द्यावा व रेशनकार्डपासून वंचित असलेल्यांना नवीन रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
बोगस रेशनकार्डची चौकशी कासवगतीने
By admin | Updated: May 31, 2014 21:54 IST