शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव; फवारणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST

बाळापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप ...

बाळापूर : यंदा तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराचा सामना करावा लागला. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु जमिनीतील ओलावा कायम असल्याने रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. सध्या हरभऱ्याचे पीक बहरले आहे. गत आठवड्यात ढगाळ‌ वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित सापडला आहे. अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने विहिरी, तलाव, कूपनलिकांना भरपूर पाणी असल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाकडून आशा वाढल्या आहेत. यंदा शेतकऱ्यांनी गहु, हरभरा पिकांना पसंती दिल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेेत्र वाढले आहे. सध्या ग्रामीण भागात हरभऱ्याचे पीक बहरलेले असून, फूलधारणा अवस्थेत आहे. गत आठवड्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरीही अळीवर नियंत्रण येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतित वाढ झाली आहे. सध्या तालुक्यात फवारणीला वेग आला असून, कृषी विभागाने शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

----------------------

१०,४५२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी

गतवर्षीपेक्षा यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यात यंदा रब्बी हंगामात १०,४५२ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्यावर अळीचे आक्रमण वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

--------------------------------

तालुक्यातील प्रकल्प पूर्ण होण्याची प्रतीक्षा

बाळापूर तालुक्यात कोणत्याही प्रकल्पातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. तालुक्यातील नेर धामणा व कारंजा रमजानपूर येथील प्रकल्प अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे.

------------------

खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी केली; मात्र सध्या हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता वाढली आहे.

- संतोष वानखडे, काळबाई शिवार, बाळापूर

--------------------

फोटो