शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढतीच

By admin | Updated: March 12, 2015 01:43 IST

अवकाळी पाऊस व वातावरणातील गारव्याने रुग्णांमध्ये वाढ

अकोला : स्वाइन फ्लू या गंभीर आजाराने अकोल्यात उपचार घेत असलेल्या चार जणांचा बळी घेतल्यानंतर मंगळवारी दोन महिलांचा अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारपासून वातावरणात बदल झाला असून, अवकाळी पाऊस व हवेतील गारव्याने स्वाइन फ्लूसाठी पोषक वातावरण झाले असून, रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याचा धोका तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गत तीन दिवसांपासून उपचार घेत असलेल्या केशवनगर येथील सोनाली केशव इंगोले व आकोट फैल येथील रहिवासी हिना परविन यांचा तपासणी अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच सोनाली इंगोले यांचे पती अँड. केशव इंगोले यांनाही स्वाइन फ्लू संशयित म्हणून दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या नरेश पुंडलिक फुंड (३२), रा. मानोरा रोड, कारंजा लाड, सोपान वासुदेव उगले (५४), रा. मलकापूर रोड, नांदुरा, रावसाहेब साहेबराव देशमुख (३५), रा. मानोरा, वाशिम, किरण महेश अग्रवाल (५५), रा. शिवाजीनगर, भुसावळ, अथर्व मंगेश पांडे (3), रा. वरखेड, बाश्रीटाकळी यांचाही स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात आणखी ५ संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून, शहरातील खासगी रुग्णालयामध्ये २ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत