शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव बाजार परिसरात अवैध दारु विक्रीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2017 19:31 IST

माळेगाव बाजार- दारुड्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी गावात शासकीय नियम धाब्यावर बसवून सकाळी ५ वाजेपासून दारू विक्री सुरू होत असल्याचे निदर्शनास आले.

ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव घ्यावामाळेगाव बाजार : सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहाचा घोट घेतल्याशिवाय दिवसाला प्रारंभ होत नाही. परंतु दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्यांना सकाळीच दारूचा पहिला घोट घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाल्यासारखे वाटत नाही. अशाच दारुड्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी गावात शासकीय नियम धाब्यावर बसवून सकाळी ५ वाजेपासून दारू विक्री सुरू होत असल्याचे निदर्शनास आले.तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या माळेगाव बाजार येथे खुलेआम दारूची विक्री सुरू आहे. यामुळे येथील महिलांमध्ये दारू विक्रेत्यांविषयी कमालीचा रोष व्यक्त होत आहे. दारूमुळे अनेक तरुण व्यसनाधिन झाला तर अनेकांना कमी वयात मृत्यू आला. दारूच्यापायी अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. यापूर्वी ८ मार्च माहिला दिनी येथील परवाना असलेल्या देशी दारूचे दुकान उध्वस्त करण्यात आले होते. त्या घटनेला बरीच वर्ष उलटले आहे. त्या आंदोलनात स्थानिक महिलांचा मोठा सहभाग होता. तेव्हापासून येथील दारू विक्री काही वर्ष बंद होती. मात्र, आता आणखी दारू विक्रीस ऊत आला आहे.गरिबांच्या संसारावर डल्ला मारणारे दारू विक्रेते ‘गब्बर’ झाले तर पिणाऱ्यांची वाट लागली. हल्ली बिअर बार बंद असल्यामुळे माळेगाव बाजार गावात नजीकच्या बुलडाणा व कुऱ्हा येथून चोरी-चुपके दारू येत आहे. दारू पिण्याकरिता तेल्हारा शहरातून काही मंडळी माळेगावात येत असल्याचे कळते. विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या लहानमोठ्या जवळपास ७ लोकांकडे दारू विक्री सुरू आहे. याच दारू विक्रेत्यांकडे सकाळी ५ वाजतापासून दारू पिणाऱ्यांची वर्दळ असते. आजुबाजूच्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याला भांडणतंट्यामुळे काही लोक विरोध करीत नाहीत. दिवसभर दारू घेणाऱ्यांना सकाळी ५ वाजता (उतारा) चहाचा घोट घेण्यापूर्वीच दारूचा घोट पाहिजे. हा प्रकार येथे पहावयास मिळतो.सध्या तेल्हारा शहरातील सर्वच देशी, विदेशी दारू दुकाने बंद असून जवळच्या माळेगाव बाजारसारख्या मोठमोठ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. अवैध दारू विक्री संदर्भात असलेल्या नियमावलीकडे दारुबंदी उत्पादन शुल्क विभागानेही अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे.