शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: December 26, 2014 01:06 IST

तब्बल ४३ पदे रिक्त : उपलब्ध कर्मचा-यांवर कामाचा ताण, नागरिकांनाही त्रास.

मूर्तिजापूर (अकोला) : स्थानिक तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांची तब्बल ४३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर कमालीचा ताण येत आहे, तर कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर तहसील कार्यालयात कर्मचार्‍यांची १५१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सद्य:स्थितीत १0८ कर्मचारी कार्यालयात कार्यरत आहेत; मात्र थोडीथोडकी नव्हे, तर ४३ कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. तालुक्यातील नागरिकांच्या अनेक कामांवर त्याचा परिणाम होत आहे. तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना लागणारी विविध प्रकारची कागदपत्रे, प्रमाणपत्रे व मूलभूत गरजांच्या पूर्ततेशी संबंधित कामे तहसील स्तरावरच होतात. ही कामे करण्यासाठी निदान कार्यालयासाठी मंजूर असलेली कर्मचार्‍यांची पदे वरिष्ठ प्रशासनाकडून भरली जाणे आवश्यक असते. या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ह्यशासन आपल्या दारीह्ण आणि शासनाच्या जनहितार्थ सेवांचा फज्जा उडत आहे. मूर्तिजापूर तहसील कार्यालयात रिक्त असणार्‍या पदांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सामान्य प्रशासनाच्या आस्थापनेमध्ये पाच पदे रिक्त आहेत. पुरवठा विभागात पाच पदे रिक्त आहेत. त्याचा रेशन वाटपासंबंधीच्या कामांवर परिणाम होत आहे. रेशन कार्ड मिळण्यासंबंधीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. निवडणूक विभागातील कनिष्ठ लिपिकाचे पद रिक्त आहे. विशेष बाब म्हणजे, या विभागाचे नायब तहसीलदार मोरे या ३१ मार्चला सेवानवृत्त होणार आहेत. त्यामुळे ३१ मार्चनंतर या विभागात दोन पदे रिक्त होतील. संजय गांधी निराधार योजना विभागात चार पदे रिक्त आहेत. त्यातही या विभागाचे नायब तहसीलदार पी. के. देशमुख हे ३१ डिसेंबरला सेवानवृत्त होणार आहेत. त्यामुळे तेथील पाच पदे रिक्त राहतील. त्याचा विभागाच्या कामकाजाला मोठा फटका बसणार आहे. तहसील कार्यालयात ४३ रिक्त पदे आहेत. त्या पदांवर भरती व्हावी, यासाठी मी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. या रिक्त पदांमुळे कामकाजावर निश्‍चितपणे परिणाम होत असल्याची स्विकारोक्ती तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांनी दिली.