अकाेला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा बुधवारी पार पडली. सभेत याेजनांचा आढावा घेण्यात आला. सभेला सभापती मनिषा बाेर्डे, सदस्या गायत्री कांबे , योगिता रोकडे ,रिजवाना परवीन शे. मुक्तार ,मीनाक्षी उन्हाळे ,लता नितोने, वंदना झळके ,ऊर्मिला डाबेराव ,अनुसया राऊत आदी सदस्य उपस्थित होते. सभेचे पदसिद्ध सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग विलास मरसाळे सभेचे कामकाज पाहिले.
काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रखडलेल्या याेजना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात राबिवण्याचा तसेच महिलांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रमही पुढील वर्षात राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना, काही नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश असून यंदासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांना शिलाई मशीन-४८८ ,पिको मशीन -१७४ ,लेडीज सायकल -४६२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.