शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधात्मक क्षेत्रांत उपाययोजनांची अंमलबजावणी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:27 IST

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अमरावती विभागासाठी आदेश जारी केले. त्यामध्ये ...

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी अमरावती विभागासाठी आदेश जारी केले. त्यामध्ये संसर्ग जास्त असलेल्या भागाला प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करुन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले . त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख तसेच सर्व झोनल अधिकारी आदी उपस्थित होते.

अकोला महानगरपालिका क्षेत्र तसेच अकोट व मूर्तिजापूर नगरपरिषद क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले असून या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आहे त्या भागात बॅरिगेट्स लावणे, होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारणे, रुग्ण घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील परवानगी व्यतिरिक्त जी दुकाने व आस्थापना सुरू असतील त्यांच्यावर कारवाई करणे, याशिवाय प्रतिबंधात्मक क्षेत्रात रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात नमुने संकलनासाठी विशेष उपाययोजना राबवून अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेेंद्र पापळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.