शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल हवे असेल तर पाच हजार रुपये जमा करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST

पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिल्या जाते. शहरात २०१७ पासून ते आजपर्यंत महापालिका ...

पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिल्या जाते. शहरात २०१७ पासून ते आजपर्यंत महापालिका प्रशासनाने ५४ हजार नागरिकांची नाेंदणी केली आहे. यापैकी केवळ ६८० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, याेजनेची अंमलबजावणी करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. परंतु याेजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या अपेक्षा अद्यापही कायम असल्याने त्यांच्याकडून मनपाचे उंबरठे झिजवल्या जात असल्याचे दिसून येते. लाभार्थ्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत काही अज्ञात व्यक्तींकडून आर्थिक गंडा घालण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मनकर्णा प्‍लॉट येथील पात्र लाभार्थी योगीराज वाडे यांना घरकुल रद्द झाल्याचे सांगत यादीमध्ये नाव नाेंदविण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी अज्ञात व्यक्तीने भ्रमणध्वनीद्वारे केली. याप्रकरणी वाडे यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदवली. दरम्यान, या प्रकाराची मनपा प्रशासन व महापाैर अर्चना मसने यांनी दखल घेत ‘पीएम’आवास याेजनेमधील पात्र लाभार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

‘पीएम’आवास याेजनेतील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी अथवा अनुदानाच्या मागणीसाठी काेणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची गरज नाही. काेणीही पैशांची मागणी केल्यास पाेलीस स्टेशन व मनपा प्रशासनाकडे तक्रार करावी.

-अर्चना मसने, महापाैर, मनपा

; ! ? () -