शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST

कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ज्येष्ठनागरिकांसह ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या लाभार्थींना कोविड लसीकरण केले जात आहे. यासोबतच आरोग्य कर्मचारी आणि ...

कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ज्येष्ठनागरिकांसह ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या लाभार्थींना कोविड लसीकरण केले जात आहे. यासोबतच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देखील देणे सुरू आहे. अशातच १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांनाच कोविड लस दिली जाणार आहे. त्यामुळे सध्यस्थितीत उपलब्ध लसीचा साठा अपुरा ठरणार आहे. नव्या नियोजनानुसार, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के म्हणजेच जवळपास ६ लाख लोकसंख्येला लस देण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन असल्याची माहिती आहे. त्यापैकी आतापर्यंत जवळपास ७० हजार लोकसंख्येला लसीकरण झाले आहे. त्यानुसार, आरोग्य विभागाकडून वाढीव लसीची मागणी केली जाणार असून, त्याचे नियोजन शनिवारी केले जाणार आहे. परंतु, वाढीव मागणी येवढा लसीचा पुरवठा न झाल्यास लसीकरण मोहीम अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१६ जानेवारी जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले

पहिला डोस - दुसरा डोस

आरोग्य सेवक - ९८१७ - ४१३६

फ्रंटलाईन वर्कर्स - ८३८९ - ४१३२

ज्येष्ठ नागरिक - ३५७७४

४५ वर्षावरील सहव्याधी असलेले- ७४१८

सध्या आठवड्याला २५ हजार डोसची मागणी

सद्यस्थितीत आठवड्याला २५ हजार डोसची मागणी आहे, मात्र १ एप्रिलपासून या मागणीत जवळपास दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजन करण्यात येणार असल्याची महािती आहे.

एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना द्यावी लागणार लस

१ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांनाच लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्याही एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के म्हणजेच ६ लाख होणार असल्याची माहिती वैद्यीकय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पुढील महिन्यापासून कोविड लसीची मागणी वाढणार आहे. त्यानुसार, नियोजन करण्यात येत असून, आवश्यक लसीची मागणी केली जाणार आहे. सध्यस्थितीत उपलब्ध लस लाभार्थींना दिली जात आहे.

- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण, अकोला