शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अनुभवला पवारांचा अभिष्टचिंतन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे व्हर्च्युअल प्रक्षेपण संपूर्ण राज्यभरात करण्यात आले. अकोल्यात हा प्रक्षेपण सोहळा ...

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे व्हर्च्युअल प्रक्षेपण संपूर्ण राज्यभरात करण्यात आले. अकोल्यात हा प्रक्षेपण सोहळा रिंगरोडवरील जानोरकर मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्या राजकीय व सामाजिक कार्याबाबत मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. सोहळ्यादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. यामध्ये माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, प्रा. विश्‍वनाथ कांबळे, महानगराध्यक्ष राजकुमार मुलचंदानी, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, रायुकाँ महानगराध्यक्ष करण दोड, माजी महानगराध्यक्ष अजय तापडिया, प्रा. विजय उजवणे, शेख अजीज भाई, माजी नगरसेवक पंकज गावंडे, फजलू पहेलवान, विशाल गावंडे, परिमल लहाने, विद्या अंभोरे, सुष्मा कावरे, भारती निम, महानगर युवती आघाडीच्या मेघा पाचपोर आदी उपस्थिती होती. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रवेशद्वारावर अमृता सेनाड यांनी रांगोळीमध्ये साकारलेली शरदचंद्र पवार यांची आकर्षक प्रतिमा लक्ष वेधून घेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अकोट शहराध्यक्षपदी ताज राणा यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली. (फोटो)

----------------------------------

मी साहेबांपासून प्रेरणा घेतली, तुम्हीही घ्या - गुलाबराव गावंडे

या व्हर्च्युअल अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपणही एक वेळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु शरदचंद्र पवार ८०च्या वयात समाजकारण आणि राजकारणात एवढे सक्रिय राहून महाराष्ट्रासाठी झटत आहेत, हे पाहून त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन समाजकारण व राजकारणात सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

----------------------------------

पवार साहेब देशाच्या राजकारणातील आदर्श- अमोल मिटकरी

पद्मविभूषण शरदचंद्र पवार हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. सर्व घटकांच्या विकासासाठी त्यांनी आजवर केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. म्हणूनच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे मनोगत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.