शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो लिटर दुधाचा अपव्यय!

By admin | Updated: November 20, 2015 02:43 IST

शासकीय दूध योजनेतील पाकीट बंद करणारे यंत्र निकामी, वितरकांना भुर्दंंड.

अकोला : येथील शासकीय दूध योजनेत दूध पिशवीत टाकून बंद करणारे यंत्र बिघडल्याने दूध योजनेत शेकडो लिटर दुधाचा अपव्यय होत असून, शासकीय दूध वितरकाकडे दिलेल्या पिशव्या फुटत असल्याने त्यांना दररोज याचा आर्थिक भुर्दंंड सहन करावा लागत आहे. अकोला जिल्ह्याला दररोज तीन लाख लिटरपेक्षा अधिक दुधाची आवश्यकता आहे; परंतु तेवढे दुधाचे उत् पादन येथे होत नसल्यामुळे इतर जिल्ह्यांतील खासगी कंपन्यांचे दूध या जिल्ह्यात विकले जात आहे. येथे शासकीय दूध योजना आहे. या योजनेतून शुद्ध दुधाचा पुरवठा शहराला केला जातो; परंतु विदर्भातच नव्हे, तर राज्यात नावाजलेल्या अकोला येथील शासकीय दूध योजनेचे तीनतेरा वाजले असून, या योजनेला सुरुवात झाली तेव्हापासूनच्या कालबाह्य यंत्रांद्वारे येथे दुधावर प्रक्रिया करू न पिशवीबंद केले जात आहे. शासकीय दूध योजनेतील दूध शुद्ध असल्याने त्याला मागणी भरपूर आहे; परंतु या योजनेला मिळणार्‍या दुधाचा पुरवठा अल्प असल्याने या मोजक्याच दुधावर येथे प्रक्रिया करू न विक्री केली जात आहे. योजनेची सर्व यंत्रे व यंत्रणाच मोडकळीस आली असून, कालबाह्य यंत्रांद्वारे चालढकल सुरू आहे. येथे येणार्‍या दुधावर प्रक्रिया केल्यानंतर दुधाच्या पिशव्या सीलबंद केल्या जातात; परंतु ज्या यंत्रात या पिशव्या बंद केल्या जातात, ते यंत्र बिघडले आहे. त्यामुळे या ठिकाणी शेकडो लिटर दुधाचा अपव्यय होत असून, शासकीय दूधविक्रेते ज्या पिशव्या विक्रीसाठी नेतात, त्यातील २५ ते ३0 पिशव्यांतून दूध बाहेर पडत असल्याने शासकीय दूधविक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सतत आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने शहरातील दूधविक्रेत्यांनी गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता ही बाब शासकीय दूध योजनेच्या अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली.