शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयामध्ये २१0 खाटा वाढणार!

By admin | Updated: September 10, 2015 02:17 IST

सात वार्डांसह दोन वसतिगृहाचे विस्तारीकरण.

अकोला: पश्‍चिम विदर्भाचे ट्रामा केअर सेंटर म्हणून सर्वोपचार रुग्णालयाकडे पाहिले जाते. पश्‍चिम विदर्भातील हजारो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातील ५५४ खाटा कमी पडत असल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने रुग्णालयातील खाटा वाढवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार सर्वोपचार रुग्णालयात २१0 वाढीव खाटा वाढणार असल्याने, सात नवीन वार्ड बांधण्यात येणार आहेत. तसेच मुला-मुलींच्या वसतिगृहाचे सुद्धा विस्तारीकरण होणार आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाने २१0 व केंद्र शासनाने २00 खाटा वाढवून देण्यास सहमती दर्शविली होती. त्यापैकी राज्य शासनाकडून २१0 वाढीव खाटांना मंजुरी मिळाली असून, त्यासाठीच्या सात नव्या वार्डांचे बांधकाम, वैद्यकीय महाविद्यालयातील मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या विस्तारीकरणासाठी शासनाकडून १६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. सर्वोपचार रुग्णालयात दररोज अकोला जिल्हय़ासह बुलडाणा, वाशिम व अमरावती जिल्हय़ातील रुग्ण येतात. दररोज शेकडो रुग्ण भरती होत असल्याने वार्डांमधील खाटा कमी पडतात. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटांची संख्याही वाढविण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय महाविद्यालयास पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारामुळे २१0 जागा वाढून मिळाल्या आणि त्यासाठी ३४ कोटी रुपयांचा निधीसुद्धा प्राप्त झाला. त्यापैकी १६ कोटी रुपयांच्या निधीतून २१0 खाटांसाठी सात नव्या वार्डांचे बांधकाम, वसतिगृहाचे विस्तारीकरण होणार आहे. तसेच रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे सुद्धा विस्तारीकरण करण्यात येणार असल्याने, त्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यात दोन शल्यचिकित्सागृह सुद्धा उभारले जाणार आहेत. बांधकाम विभागाकडून लवकरच निविदा बोलावून, कामास सुरुवात होणार आहे.