शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

होळी, धूलिवंदन यंदाही नियमातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:18 IST

अकोला- काेराेनाच्या उद्रेकामुळे गेल्यावर्षी हाेळी व धूलिवंदन हे उत्सव काेराेना नियमावलीतच साजरे झाले हाेते यंदाही तीच परिस्थिती कायम असून ...

अकोला- काेराेनाच्या उद्रेकामुळे गेल्यावर्षी हाेळी व धूलिवंदन हे उत्सव काेराेना नियमावलीतच साजरे झाले हाेते यंदाही तीच परिस्थिती कायम असून २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होळी, धूलिवंदन, गुडफ्रायडे व इस्टर संडे यासणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सण अत्यंत साधेपणाने साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

कोणत्याही प्रकारे गर्दी न करता हा सण साजरा करावा. धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाणे साजरे करावे. काही ठिकाणी होळी शिमग्यानिमित्त मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, गर्दी होणार नाही याची काळजी घेत दर्शनाची सोय करावी. कोणत्याही प्रकारे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये.

गुड फ्रायडे व इस्टरची प्रार्थनाही नियमात

२८ मार्च ते दि.४ एप्रिल या होलीविक दरम्यान प्रत्येक प्रार्थनासभेच्या वेळी चर्चमध्ये उपलब्ध जागेनुसारच लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करावे. जास्तीत जास्त ५० व किमान १० ते २५ लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. सामाजिक अंतर कायम राहिल, याची खबरदारी घेऊन आवश्यकतेनुसार चार ते पाच प्रार्थना सभांचे वेगवेगळ्या वेळी आयोजन करावे. प्रार्थनेच्या वेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याची खबरदारी घ्यावी. चर्चच्या व्यवस्थापकांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाइन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून घ्यावी. या सणांनिमित्त दिले जाणारे संदेश सोशल मीडियातून प्रसारित करावे. चर्चच्या बाहेर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. मिरवणुका व गर्दी आकर्षित होईल असे कार्यक्रम आयोजित करू नये. असे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिले आहेत.