शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

इसमाची दगडाने ठेचून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:08 IST

बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या एकाने संशयिताची दगडाने ठेचून हत्या केली. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मंगेश बोरीकर या युवकाला खुनाच्या आरोपात अटक केली आहे.

ठळक मुद्दे लालगुड्यातील घटना : प्रेयसीच्या संतप्त भावाने केले कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या एकाने संशयिताची दगडाने ठेचून हत्या केली. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मंगेश बोरीकर या युवकाला खुनाच्या आरोपात अटक केली आहे.वणी शहरालगतच्या रजानगर (लालगुडा) भागात राहणाऱ्या एका महिलेशी अशोक येलनवार (३५) याचे प्रेमसंबंध असल्याची शंका तिचा भाऊ मंगेश बोरीकर याला होती. यातून अनेकदा त्याचे बहिणीशी खटकेही उडालेत. सदर महिला आपल्या पतीपासून विभक्त राहते. संबधित महिला व अशोक येलनवार यांची बोलचाल नित्याचीच होती. त्यातून मंगेशला नेहमीच शंका येत होती. या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याची त्याची भावना झाली. एमआयडीसीमध्ये मेकॅनिकल म्हणून काम करणारा मंगेश बोरीकर गुरूवारी रात्री कामावरून घरी आला. यावेळी त्याची बहिण घरात नव्हती. त्यामुळे तिला शोधण्यासाठी मंगेश पुन्हा घराबाहेर पडला.दरम्यान, त्याच परिसरात एका घराच्या आडोशाला अशोक व मंगेशची बहीण गप्पा करीत असताना मंगेशच्या नजरेस पडले. त्यामुळे बेभान होऊन मंगेशने अशोकवर हल्ला करून त्याला खाली पाडले. त्यानंतर बाजूला असलेला दगडच अशोकच्या डोक्यात घातला. यामुळे गंभीर जखमी झालेला अशोक जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वणीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मंगेशला ताब्यात घेतले. याप्रकरणी मृत अशोकच्या भावाने पोलिसांकडे तक्रार केली आहे. मृत अशोक हा नळ फिटींगचे कामे करीत होता. त्याचे लग्नही झाले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.मंगेश अनेकदा दिली होती अशोकला तंबीआरोपी मंगेशने मृत अशोक येलनवार याला माझ्या बहिणीशी बोलायचे नाही, अशी अनेकदा तंबी दिली होती. त्यावरून या दोघांमध्ये वादही झाला होता. गुरूवारी रात्री या वादाचे पर्यावसन अशोकच्या हत्येत झाले. शुक्रवारी आरोपीला न्यायालयापुढे उभे करण्यात आले. न्यायालयाने आरोपी मंगेशला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.