शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

लाखपुरी येथे भीषण पाणीटंचाई; ग्रामस्थांची भटकंती

By admin | Updated: June 18, 2017 02:01 IST

दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प : ग्रामस्थांचा मोर्चा काढण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखपुरी : गावात गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांची पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे. लाखपुरी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेचा पाणीपुरवठा गेल्या १0 दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातील दूषित पाणी येते. गावात पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने ३ ते ४ दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जातो. १0 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, वापरासाठी पाणीसुद्धा मिळत नाही. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या फाट्यावर हातपंप आहे. ग्रामस्थांना तेथून पाणी आणावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनीधींचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकर्‍यांसह मजुरांना आपली मजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइनवर अनेक ठिकाणी लिकेज आहेत. या लिकेजमधून गावातील सांडपाणी पाइपलाइनमध्ये जात असून, त्याचाच पुरवठा ग्रामस्थांना होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.