डॉ. उमेश कवळकर, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी
कोरोना काळात शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती समाजात रूढ झाली, मात्र योग्य तंत्रज्ञानाअभावी प्रत्येकापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचू शकले नाही. या दृष्टिकोनातून शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. ऑनलाईन शिक्षण ग्रामीण भागातही पोहोचावे, या अनुषंगाने बजेटमध्ये शिक्षण तसेच रोजगार निर्मितीला स्थान हवे.
- मेघा अनासुने, विद्यार्थी, अकोला
कोरोनामुळे आधीच प्रत्येक गृहिणीचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात गॅसच्या किंमती वाढणार नाहीत, याची काळजी घ्या. आरोग्यासोबतच शिक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद अपेक्षित आहे. महिलांना रोजगार मिळेल, उद्योग आणि व्यापार क्षेत्रात महिलांना संधी मिळेल, या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पात तरतूद अपेक्षित आहे.
- धनश्री विशाल वंजारे, गृहिणी,अकोला