शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

आरोग्य विभागाच्या आदेशाला मलेरिया विभागाचा खो!

By admin | Updated: July 9, 2016 01:03 IST

जनजागृतीला ठेंगा: आरोग्य धोक्यात.

अकोला: दरवर्षी जुलै महिन्यात डेंग्यूच्या आजारांत वाढ होत असल्याचे पाहून राज्याच्या आरोग्य विभागाने संपूर्ण जुलै महिन्यात नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करण्याचा आदेश हिवताप विभागाला दिला. हा आदेश पायदळी तुडवत महापालिकेच्या हिवताप विभागाने अद्यापही शहरात जनजागृतीसाठी पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या उदासीन भूमिकेमुळे अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.पावसाळ्याच्या दिवसांत वाढणारी डासांची संख्या आणि त्यामुळे होणारे डेंग्यूसारखे आजार यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने राज्याच्या आरोग्य विभागाने जुलै महिन्यात विशेष मोहीम आखली आहे. राष्ट्रीय कीटकजन्य कार्यक्रमांतर्गत राज्यभरात डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी जुलै महिना हा डेंग्यूप्रतिरोध महिना म्हणून पाळला जाणार आहे. यामध्ये जनजागृतीसाठी प्रदर्शने, दिंडी, चित्रकला, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. डॉक्टर व नागरिकांसाठी सार्वजनिक कार्यक्रम, पत्रके वाटप अशा स्वरूपाचे कार्यक्रम महिनाभर घेण्याची सूचना आहे. १५ व २५ जुलै हे दिवस नागरिकांनी कोरडे दिवस पाळावेत, असे आवाहनही या अभियानामध्ये करण्यात आले आहे. संपूर्ण जुलै महिन्यात जनजागृती करण्याचे जिल्हा व शहराच्या हिवताप विभागाला आदेश आहेत. या आदेशाला महापालिकेने केराची टोपली दाखवली आहे.