शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीच्या भिंतीला मिळाले मदतीचे हात..

By admin | Updated: October 22, 2016 02:44 IST

शेकडो दानदात्यांनी दिले कपडे, ‘भारत एक कदम’चा उपक्रम

अकोला, दि. २१- अनेकांना समाजासाठी काहीतरी वेगळे करावे, असे मनोमन वाटत असले, तरी मदत करण्याची भावना बर्‍याचदा मनातच राहते; परंतु भारत एक कदम संस्थेने माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू करून अकोलेकरांना गोरगरीब, गरजूंच्या मदतीची एक संधी उपलब्ध करून दिली आणि पहिल्याच दिवशी माणुसकीच्या भिंतीकडे शेकडो सहृदयी दानशूरांनी मदतीचे हात पुढे केले. अनेकांच्या घरी चांगल्या व सुस्थितीतील कपडे असतात. लहान मुलांची खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट याशिवाय इतरही काही वस्तू असतात; परंतु आम्ही एकतर या वस्तू फेकून देतो किंवा जाळून टाकतो; परंतु कपड्यांचा, आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा गोरगरीब, गरजूंना काही उपयोग होऊ शकतो का, याचा आम्ही विचारच करीत नाही. भारत एक कदम संस्थेने हा विचार करून कपडे, खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट या वस्तू गोळा करून त्या गोरगरीब व गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम सुरू केला. गुरुवारी या उपक्रमाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्घाटन केले. यावेळी मंचावर भारत एक कदम संस्थेचे संचालक व माणुसकीच्या भिंती उपक्रमाचे संयोजक अरविंद देठे, प्रसिद्ध उद्योजक देवराव कापडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, डॉ. कमल देठे उपस्थित होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी समाजामध्ये दरी निर्माण होत आहे, ही दरी माणुसकीच्या विचारांनीच मिटविल्या जाऊ शकते. समाजामध्ये अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्या मदतीसाठी सर्वांंनी पुढे आले पाहिजे. द्वेषाच्या भिंती तोडून माणुसकीच्या भिंती उभारण्याची समाजात गरज आहे, असे सांगत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गोरगरीब, गरजूंसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सर्वांंनी कपडे, खेळणी व इतर साहित्य देऊन मदत करावी, असे आवाहन केले. अरविंद देठे यांनी मनोगत व्यक्त करताना, सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही माणुसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरू केला. कार्यक्रमादरम्यान अस्पायर संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे, अँड. सुधाकर खुमकर, गणेश पोटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, शौकतअली मीरसाहेब, अनिल माहोरे, संजय चौधरी, भारती शेंडे, पुरुषोत्तम मालाणी, मनीष सेठी, प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व उमेश सापधारे आदींनीही विचार मांडले.