शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अधांतरीच!

By admin | Updated: April 26, 2017 02:15 IST

खरेदी बंद : तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली ताटकळत बसण्याची वेळ

अकोला : हमीदराने ‘नाफेड’द्वारे तूर खरेदी २२ एप्रिलपासून बंद करण्यात आली असल्याने, जिल्ह्यात पाच खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यापासून उभ्या असलेल्या १ हजार ९६३ ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अद्याप अधांतरीच आहे. त्यामुळे तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबतची प्रतीक्षा करीत तूर उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत होती. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तसेच अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर नाफेडद्वारे तूर खरेदी करण्यात येत होती. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असताना, तूर खरेदीची प्रक्रिया मात्र संथगतीने करण्यात आली. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने, गत २६ फेबु्रवारी रोजी खरेदी केंद्रांवर आलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. दीड महिना उलटूनही तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. तुरीचे मोजमाप केव्हा होणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकरी करीत असतानाच शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली. नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात आली असली, तरी जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर १ हजार ९६३ तुरीचे ट्रॅक्टर उभे आहेत. दीड महिन्यापासून खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप केव्हा सुरू होणार, याबाबतची स्थिती अद्याप अधांतरीच आहे. त्यामुळे तुरीच्या मोजमापासाठी जिल्ह्यातील ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर ताटकळत बसण्याची वेळ तूर उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप ‘नाफेड’मार्फत केव्हा सुरू करण्यात येणार, याबाबतची प्रतीक्षा तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.‘नाफेड’मार्फत तूर खरेदी बंद करण्यात आली; मात्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात उभ्या असलेल्या ६३५ टॅ्रक्टरमधील तुरीचे मोजमाप बाकी आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवरील ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप तातडीने सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी ‘नाफेड’च्या मुंबई कार्यालयाकडे केली आहे.-शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.