दहशतवादविरोधी कक्षचे प्रमुख विलास रमेश पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार म्हैसांग व रामगाव या परिसरातून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करण्यात येत आहे, या माहितीवरून त्यांनी या परिसरात सापळा रचून मोटरसायकलवर गुटख्याची वाहतूक करनाऱ्या सय्यद राशिद अली सय्यद अखिल वय २५ वर्षे, रा. बोरगाव मंजू व नंदकिशोर बाळकृष्ण माहुलकर वय ४० वर्षे, रा. रुस्तमपूर येवदा यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून प्रतिबंधित असलेला गुटखा वाह, काळी बहार, नजर, पान बहार, अशा विविध कंपनींचा सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त केला. वाहतूक उपयोगासाठी असलेली मोटरसायकल असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे गुन्हा दाखल करण्यात आल आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अकोला जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी कक्षचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.
बोरगाव मंजू परिसरातून गुटख्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST