अकोला : शहरातील शाळा तसेच महाविद्यालय परिसरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी बुधवारी छापेमारी करून आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
शहरातील शाळेसमोर सौरभ राजेंद्र वर्मा राहणार राधाकिसन प्लॉट, ओमप्रकाश घुलचंद मेहता, ब्रिजपाल सिंग लालसिंग ठाकूर रा. खोलेश्वर, सतीश खेरा मिश्रा, उमेश जमनाप्रसाद सोनार, नितेश लक्ष्मण कनोजिया, अरुण माधव कांबळे व सुशील घनश्याम तिवारी हे शाळा व महाविद्यालय परिसरात पानटपरी तसेच विविध दुकाने थाटून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी छापेमारी करून या आठ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कोटपाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.