शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्याचा साठा जप्त, दोन आरोपींना अटक

By admin | Updated: June 28, 2016 19:53 IST

गुलजारपुरा येथे एका वाहनात सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा साठा नेण्यात येत असताना डाबकी रोड पोलिसांनी जप्त केला.

अकोला - डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलजारपुरा येथे एका वाहनात सुमारे २ लाख रुपयांचा गुटखा साठा नेण्यात येत असताना डाबकी रोड पोलिसांनी मंगळवारी पहाटे छापा घालून हा गुटखा साठा जप्त केला. सदरचे वाहन जप्त करण्यात आले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.गुलजारपुरा येथील रहिवासी तसेच व्यापारी चेतन गुप्ता यांच्या घराजवळ एम एच ३५ ई ११३१ क्रमांकाच्या बोलेरो चारचाकी वाहनामध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती डाबकी रोड पोलिसांना मिळाली. यावरून डाबकी रोड पोलिसांनी गुप्ता यांच्या घराजवळील चारचाकी वाहन ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित असलेला विमल, नजर, तंबाखू व पानमसाल्यासह गुटख्याचा साठा आढळला. यावेळी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे सुनील साखळकर व सुभाष गुप्ता या दोघांना डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. डाबकी रोड पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त करून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त एस. एम. कोलते आणि अन्न निरीक्षक नितीन नवलकार यांच्या ताब्यात दिला असून, त्यांनी गुटखा जप्तीची कारवाई सुरू केली होती. शहरासह जिल्ह्यात गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना पोलिसांकडून मात्र थातुर-मातूर कारवाई करण्यात येत आहे. गत १५ दिवसांपूर्वीच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतही जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या पथकाने ४० लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा गुलजारपुरा येथून दोन लाखांचा गुटखा साठा जप्त केला. पोलीस कारवाई सुरू असतानाही गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरूच असल्याने गुटखामाफीया पोलिसांवर शिरजोर असल्याचे दिसून येत आहे. *गुटख्याची छुप्या मार्गाने वाहतूक गुटख्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केल्या असल्या, तरी रात्रीच्या अंधारात गुटख्याची छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुटखा माफीयांवर पोलिसांकडून वारंवार कारवाईची गरज असून, त्यानंतर गुटखा माफीयांचे कंबरडे मोडल्या जाणार आहेत. ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त केल्यानंतरही गुटखा माफीया काहीही न समजता पुन्हा या धंद्यात जोरात उतरत असल्याचे आजपर्यंतच्या कारवाईवरून दिसून येत आहे. त्यामुळे पाणप˜्यांसह सर्वच गुटखा माफीयांवर वारंवार कारवाईची गरज निर्माण झाली आहे.