शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रात्र शाळेतून जीवन प्रकाशमय करणारे ‘गुरू’

By admin | Updated: July 19, 2016 01:55 IST

जागृतीचा कष्टकरी मुलांसाठीचा जागर; रात्र शाळांमध्ये ‘जागृती’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

अकोला : विद्यार्थ्यांंचा शोध घेणे, त्यांच्या पालकांना समजावून सांगत शाळेत पाठवा, असा आग्रह धरणे, शाळेत आलेल्या मुलांना शिक्षणाचे धडे देतानाच माणूस म्हणून घडविण्याचे संस्कार करणे, सकाळची शाळा करून रात्री या सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे, या सर्व गोष्टी वाचल्यावर कुणालाही जुन्या काळातील एखाद्या शिक्षकाची आठवण येणे साहजिकच आहे. आताच्या काळात असे होत नाही, असा शेराही मारून आपण मोकळे होऊ. पण, अकोल्यात हे घडत आहे. गेल्या तीस वर्षांंपासून विनायक देशमुख नावाचे हाडाचे शिक्षक हे कार्य ह्यजागृती नाईट स्कूलह्णच्या माध्यमातून करीत आहेत. ही शाळा म्हणजे भरकटण्याच्या मार्गावर असलेल्या, परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांंसाठी नवा आशेचा किरण ठरला असून, विनायक देशमुख हे या रात्र शाळेतून जीवन प्रकाशमय करणारे ह्यगुरूह्ण ठरले आहेत.राज्यात दोनशे रात्र शाळा असून, त्यामध्ये १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र या सर्व शाळांमध्ये ह्यजागृतीह्णचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. १९८७ साली या शाळेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. गरीब, हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबामध्ये मुलांना शिकविण्याची ऐपत नसते, त्याला कामाला पाठवले तर तेवढाच संसाराला हातभार या हेतूने आई-बाप सुद्धा मुलांच्या शिक्षणापेक्षा उत्पन्नाला महत्त्व देतात. त्यामुळे शिक्षणाची इच्छा व बुद्धिमत्ता असलेल्या अनेकांना शिक्षणाची वाट सोडून द्यावी लागते. ही बाब हेरून विनायक देशमुख यांनी अशा मुलांचा शोध घेतला, त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले, पालकांना समजावले, मुलांना हवे तर काम करू द्या, पण रात्री शाळेत पाठवा, असा पर्याय दिला. मुले तयार होतीच पालकांनी होकार दिला अन् जागृतीचा जागर सुरू झाला तो आजतागायत.अकोल्यातील झोपडपट्टी, गावातून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थायिक झालेले कुटुंब यांचा शोध घेत विनायकरावांनी जमविलेल्या विद्यार्थ्यांंना पैलू पाडत त्यांच्यामधून हिरे घडविले. घरातील कलह व गरिबी या दोन्ही गोष्टींमुळे अनेक मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळली होती. या मुलांना चांगले वळण लावीत शिक्षणाच्या मार्गावर आणण्याचे काम देशमुखांनी केले. आज या मधील अनेक मुले चांगल्या हुद्यावर नोकरीला आहेत, कुणाचा व्यवसाय सुरू आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती तर कधीची संपली आहे. कुठलीही फी न घेता सुरू असलेल्या ज्ञानयज्ञामध्ये समाजाचाही मोठा हातभार लागल्याचे विनायकराव प्रांजळपणे सांगतात. सध्याही सकाळी शाळेत नोकरी केल्यावर जागृती नाईट स्कूलचे मुख्याध्यापक पद तेवढय़ाच आत्मीयतेने सांभाळत आहेत. शासनाने कलचाचणी आता सुरू केली, पण या शाळेतील मुलगा दहावी झाला, की त्याने कोणता मार्ग धरावा याचा कल सुरुवातीपासून सांगितला जातो. प्रत्येक वर्षी दहावीचा निकाल हा ८0 टक्क्याच्या वर अन् गुणवत्ता यादी असताना गुणवत्ता यादीत स्थान हा शाळेचा लौकिक विनायकरावांनी जपलेल्या ह्यगुरूपणह्ण या वैशिष्ट्यामुळे कायम राहिला आहे.