शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीवर राहणार ‘गिनीज बुक’ अधिका-यांची करडी नजर !

By admin | Updated: June 23, 2016 00:02 IST

यवतमाळ वनवृत्तात १४.४६ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य; विभागीय वन अधिका-यांची माहिती.

राम देशपांडे/अकोला शासनाने १ जुलै रोजी संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत यवतमाळ वनवृत्तातातील अकोला, वाशिम, यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये १४ लाख ४६ हजार वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी अरुण मेहेत्रे यांनी 'लोकमत'ला दिली. या उपक्रमावर 'गिनीज बुक'च्या अधिकार्‍यांची करडी नजर राहणार असून, या 'मेगा' उपक्रमाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. राज्य शासनाने १ जुलै रोजी आयोजित केलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत यवतमाळ वनवृत्तातील १२६ ठिकाणी १४ लाख ४६ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वन विभाग यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांतर्गत यवतमाळ वनवृत्तातील अकोला, वाशिम, यवतमाळ या तीन जिल्ह्यांतील २९ तालुक्यांमध्ये १२६ ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती मेहेत्रे यांनी दिली. या वृक्ष लागवडीची पूर्वतयारी म्हणून तीनही जिल्ह्यांतील वन अधिकारी, कर्मचारी तथा वनमजुरांच्या वेळोवेळी कार्यशाळा घेण्यात आल्या असून, वृक्ष लागवडीदरम्यान उपयोगात आणावयाच्या ह्यजीपीएसह्ण तंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात होणार्‍या दोन कोटी वृक्ष लागवडीसह, यवतमाळ वनवृत्तातील वृक्ष लागवडीची माहिती 'जीपीएस' तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संकलित करण्यात येणार आहे. संकलित झालेल्या माहितीच्या आधारे वृक्ष लागवडीची नेमकी टक्केवारी निश्‍चित होण्यास मदत होईल.

१२६ ठिकाणी घेण्यात आली 'जीपीएस'चाचणीवनवृत्तातील यवतमाळ, अकोला व वाशिम जिल्ह्यांमध्ये १२६ ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या ठिकाणी लागवड करण्यात येणार्‍या रोपांना ह्यटॅगह्ण लावले जातील. १२६ ठिकाणी लागवड करण्यात येणार्‍या रोपांची माहिती 'जीपीएस' तंत्राद्वारे पाठविणे शक्य आहे किंवा नाही, याची यशस्वी चाचणी सर्व ठिकाणी घेण्यात आली असल्याचे मेहेत्रे यांनी स्पष्ट केले.