शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

समूहशेतीने युवकांना गवसली दिशा!

By admin | Updated: January 16, 2016 02:10 IST

८0 एकरांत घेतले गव्हाचे विक्रमी उत्पादन, ‘गणेश ब्रॅण्ड’ नावाने दिली गव्हाला ओळख.

नितीन गव्हाळे, अकोला: सततची नापिकी, दुष्काळसदृश परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, सिंचनाची सुविधा नाही; अशा बिकट परिस्थितीत आकोट तालुक्यातील सुकळी गावातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आदर्श स्वयंसाहाय्यता शेतकरी गटाची स्थापना केली आणि समूहशेती करण्यावर भर दिला आणि कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन यशाचा श्रीगणेशा केला. ८0 एकरांमध्ये तब्बल ९00 क्विंटल गव्हाचे उत्पादन घेऊन त्याची बाजारपेठेत विक्री न करता, थेट ग्राहकांपर्यंंत ह्यगणेश ब्रॅण्डह्ण नावाने विक्री करून बक्कळ नफासुद्धा कमावला. सुकळी हे सातपुड्याच्या पायथ्याशी असणारं गाव. पोपटखेड प्रकल्प जवळ असला तरी गावात सिंचनाची सोय नाही. विहिरी आणि बोअरवेल आहेत; पण त्यातीलही पाण्याची पातळी खोल गेलेली. शेतकरी म्हटला की, संघर्ष पाचवीला पुजलेलाच. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा ही नेहमीचीच संकटं; परंतु यातून मार्ग काढण्यासाठी गावातील १९ युवकांनी २0१२ मध्ये एकत्र येऊन तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागलेल्या शेतीला समूहशेतीचे व्यापक स्वरूप दिले. कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यावर युवकांनी भर दिला. त्यासाठी आत्मा व कृषी विभागाची मदत घेतली. पहिल्याच वर्षी युवकांनी शरबती व सागर-वन या वाणांची लागवड करून एकरी १२ ते १४ क्विंटल सरासरीने गव्हाचे विक्रमी ९00 क्विंटल उत्पादन घेतले. गव्हाला बाजारपेठेत योग्य भाव मिळणार नाही, ही बाब हेरून युवकांनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून गव्हाची विक्री करण्याचे ठरविले. आकोटमधील खासगी आस्थापनाद्वारे गव्हाची योग्य प्रतवारी व प्रक्रिया करून, आकर्षक पॅकिंग करून विक्री सेवा केंद्र सुरू केले. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. युवकांना आत्माचे प्रकल्प संचालक अशोक बाणखेले, प्रकल्प उपसंचालक कुरबान तडवी, कृषी पणन तज्ज्ञ नरेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

१00 एकरांसाठी बियाणे, खते मिळाली

    मोफत आदर्श स्वयंसाहाय्यता शेतकरी गट असल्यामुळे पीक उत्पादनासाठी होणार्‍या खर्चातून शेतकर्‍यांना सूट मिळाली आणि समूहशेतीमुळे यांत्रिकीकरणापासून तर मशागतीपर्यंंत खर्चातून व होणार्‍या त्रासातून मुक्तता झाली. कृषी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पांतर्गत १00 एकरांचे बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, तणनाशके, बुरशीनाशके, संजीवके आदी मोफत मिळाले.