शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान मिळाले, आता मोफत पाठय़पुस्तकांची मागणी

By admin | Updated: June 22, 2015 02:19 IST

२४ विनाअनुदानित शाळा १५ वर्षांनंतर शासन अनुदानास पात्र.

अकोला : जिल्ह्यातील २४ विनाअनुदानित शाळांना १५ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शासनाने अनुदानास पात्र घोषित केले आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्या या शाळांना आता मोफत पाठय़पुस्तकांची सेवा पुरविण्यात यावी, अशी मागणी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने शिक्षणाधिकारी यांना करण्यात आली. विनाअनुदानित पात्र शाळांना अनुदान मिळावे, यासाठी १५ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. वारंवार आंदोलनं करण्यात आली, तसेच लोक प्रतिनिधींना निवेदनेदेखील देण्यात आली. समितीच्या अथक प्रयत्नानंतर राज्यातील अनुदानास पात्र शाळांची यादी घोषित करण्यात आली होती. परंतु, अमरावती विभागातील शाळांना या यादीतून डावलण्यात आले होते. त्यामुळे १२ मे रोजी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अनुदानासाठी पात्र विनाअनुदानित शाळांची यादी जाहीर केली. या यादीत जिल्ह्यातील २४ माध्यमिक शाळांचा समावेश करण्यात आला आहे. अनुदान मिळालेल्या या शाळांना नवीन सत्र सुरू होण्यापूर्वी मोफत पाठय़पुस्तके आणि शालेय पोषण आहार देण्याची तरतूद करावी, अशी मागणी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने करण्यात येत आहे. या संदर्भात कृती समितीच्यावतीने शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक सोनोने यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. अनुदानास पात्र शाळांना या योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन यावेळी शिक्षणाधिकारी यांनी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना दिले.