शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

नातवाने केली आजोबाची हत्या

By admin | Updated: April 7, 2015 02:05 IST

संपत्तीच्या वादातून केली हत्या.

अकोला: संपत्तीच्या वाट्यावरून सुरू असलेल्या वादातून नातवाने आजोबा व सावत्र आजीवर कुर्‍हाडीने वार केले. यात आजोबा जागीच गतप्राण झाले, तर आजी गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी मध्यरात्री २.३0 वाजताच्या सुमारास अमानतपूर ताकोडा गावामध्ये घडली असून, सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. डाबकी रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली. डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या अमानतपूर ताकोडा येथे राहणारे गोविंदा धनुजी मोरे (७0) हे त्यांची तिसरी पत्नी आशाबाई मोरे (६0) हिच्यासह राहत होते. सोमवारी सकाळी गावातील एक महिला त्यांच्या घरी गेली. यावेळी मोरे दाम्पत्य अंगणामध्ये रक्ताच्या थारोळय़ात पडलेले दिसून आले. ही माहिती पोलीस पाटीलांना दिल्यावर, त्यांनी डाबकी रोड पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून गंभीर जखमी आशाबाई मोरे हिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. गोविंदा मोरे यांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. पोलिसांच्या त पासामध्ये मृतक गोविंदा मोरे आणि त्यांचा नातू सचिन वाल्मीक खंडारे यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. रविवारी मध्यरात्रीदरम्यान त्याचे आजोबा गोविंदा मोरे व सावत्र आजी आशाबाई हे गाढ निद्रेत असताना आरोपी सचिनने त्यांचेवर कुर्‍हाडीने वार केले. यात मोरे जागीच गतप्राण झाले, तर आजी आशाबाई गंभीर जखमी झाली. पोलिसांनी तातडीने आरोपी सचिन खंडारे याला गजाआड केले.