शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दिग्गजांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:36 IST

निवडणुकीत दिग्गजांना पराभव स्विकाराला लागला. अंदुरा येथे पंचायत समिती सदस्य व माजी उपसरपंच पराभूत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. २३ जून रोजी घेतलेल्या मतदानाचा सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत दिग्गजांना पराभव स्विकाराला लागला. अंदुरा येथे पंचायत समिती सदस्य व माजी उपसरपंच पराभूत झाले.अकोला तालुक्यातील उगवा येथील प्रभाग क्र. ४ मधून नलिनी सत्यशील सिरसाट या २६७ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी अनिता सुमेध सिरसाट यांना २१२ मते मिळाली. सांगळूद ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र.१ मधून पवनकुमार मक्कालाल जयस्वाल हे २९० मते घेऊन तर सिंधुताई देवानंद वाहुरवाघ या २९७ मते घेऊन विजयी झाल्या. सांगळूदच्या प्रभाग क्र.३ मधून प्रभाकर दौलतराव राक्षसकर (४७१) व अजाबराव फाल्गुन सिरसाट (४७५) हे विजयी झाले आहेत. अकोट तालुक्यात मूर्तिजापूर तालुक्यातील मंदुरा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र.१ मध्ये अमोल श्यामराव तेलमोरे हे ९७ मते घेऊन विजयी झाले. तसेच हातगाव येथील प्रभाग क्र.१ मधून संदीप शंकरराव बोळे हे विजयी झाले. त्यांना २३२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश पुंडलीकराव जोगळे यांना २१६ मते मिळाली. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे प्रभाग क्र.३ मधून सादिक अ. रफिक मन्यार (६११), सांगवी (जोमदेव) येथील प्रभाग क्र.१ योगीता महेंद्र सांगोकार (६५), प्रभाग क्र. २ इंद्रभान सांगोकार (८५) हे विजयी झाले. पारस येथे वॉर्ड क्र. १ इंदूताई श्रीकृष्ण लांडे २३२ विजयी झाले. अकोट तालुक्यातील पारळा येथील प्रभाग क्र.३ मध्ये आशा प्रमोद नगदे यांनी १५१ मते घेउन विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शोभा श्रीराम नागे यांना १०७ मते मिळाली.शिंगोलीच्या सरपंचपदी महेंद्र बोर्डेबाळापूर: तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायतच्या सरपंचपदी महेंद्र शेषराव बोर्डे हे विजयी झाले आहेत. शिंगोली ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २३ जून रोजी मतदान घेण्यात आले. तसेच २४ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला. सरपंच पदासाठी सरळ लढत होऊन महेंद्र बोर्डे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी सरपंच मुलीधर बोर्डे यांचा ४५ मतांनी पराभव केला. महेंद्र बोर्डे यांना १६० तर मुरलीधर बोर्डे यांना ११५ मते मिळाली. सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये कृष्णाताई पंकज बोर्डे ४९, चंद्रकला शेषराव बोर्डे या विजयी झाल्या, तर प्रभाग क्र. २ पंकज शेषराव बोर्डे ५५, मंगला मुरलीधर बोर्डे ५७, प्रियंका नितेश इंगळे ६३, स्वाती संतोष बोर्डे ५७ यांनी विजय मिळवला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAkolaअकोला