शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयातून चोरीस गेलेले दागिने हस्तगत!

By admin | Updated: July 18, 2016 02:16 IST

साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरणा-या दोन अट्टल चोरट्यांना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी जेरबंद केले.

अकोला - ओसवाल भवनमध्ये असलेल्या एका विवाह सोहळय़ातील सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरणार्‍या दोन अट्टल चोरट्यांना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. या दोघांकडून सुमारे सोडतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणातील एक अट्टल चोरटा अद्यापही फरार आहे.जुने शहरातील रहिवासी संदीप दिवेकर यांच्या चुलत भावाचे ओसवाल भवन येथे १३ जुलै रोजी लग्न होते. त्यामुळे मुलीकडील मंडळी व मुलाकडील मंडळी दाग-दागिने घेऊन ओसवाल भवन येथे आले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून ऐवज लंपास केला होता. यामध्ये पाच सोन्याच्या अंगठय़ा २५ ग्रॅम किंमत ५0 हजार रुपये, दोन सोन्याचे गोप २0 ग्रॅम किंमत ३0 हजार रुपये, सोन्याचा चपळा हार ३0 ग्रॅम किंमत ६0 हजार रुपये, सोन्याचा राणी हार १५ ग्रॅम किंमत ३0 हजार रुपये, सोन्याचे नेकलेस दहा ग्रॅम किंमत २0 हजार रुपये, सोन्याचे कानातले पाच ग्रॅम किंमत दहा हजार रुपये यासह नगदी ८३ हजार, असा एकूण ३ लाख २१ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. हा ऐवज चोरी गेल्यानंतर संदीप दिवेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. घटनेनंतर तीन दिवसांच्या आतच पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. इराणी झोपडपट्टीतील गुलाम हसन औलाद हसन, खोलेश्‍वरमधील करण दशरथ वाघमारे या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. मात्र रोख रक्कम या दोन अट्टल चोरट्यांचा तिसर्‍या साथीदाराकडे असल्याची माहिती आहे.