शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

दामले चौकातून बनावट शाम्पूचा साठा हस्तगत

By admin | Updated: June 25, 2016 02:11 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल.

अकोला - रामदास पेठ परिसरातील दामले चौकातून पोत्यांमध्ये नेण्यात येत असलेला बनावट शाम्पूचा साठा रामदास पेठ पोलिसांनी जप्त केला. शाम्पूचा हा साठा विना लेबल व लेबलचा असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलीगड जिल्हय़ातील रहिवासी असलेला उस्मान अख्तर अली हा विविध कंपन्यांचे विना लेबल व लेबलचे बनावट शाम्पू घेऊन अकोल्यात विक्री करीत असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली. रामदास पेठ पोलिसांनी उस्मान अलीवर पाळत ठेवून त्याला बनावट शाम्पूची खरेदी-विक्री करीत असताना दामले चौकातील एका दुकानातून अटक केली. उस्मान अली याच्याकडून तीन पोते विविध कंपन्यांची बनावट शाम्पू जप्त केली आहे. सनसिल्क, चिक, डव्ह यांसह अनेक कंपन्यांचे बनावट शाम्पू उस्मान अली विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांची बनावट शाम्पू कोणत्या ठिकाणी बनविण्यात येत होती, त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान आहे. बनावट शाम्पू बनविणार्‍यांवरही फौजदारी कारवाई करण्यासाठी रामदास पेठ पोलीस उस्मान अली याची कसून चौकशी करीत असून, त्याच्या चौकशीतून शाम्पू बनविणार्‍यांची नावे लवकरच समोर येणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी गजानन घिरके यांच्या तक्रारीवरून उस्मान अलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.