शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. निवडणुकीचे चित्र स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 02:03 IST

वाशिम : येत्या ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्थात बुधवारी सरपंच पदाच्या ४३0; तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र बहुतांशी स्पष्ट झाले असून, रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांकडून प्रचार कार्यास वेग दिला जाणार आहे.

ठळक मुद्देसरपंच ४३0वित्त, बांधकाम विभागावर प्रश्नांचा भडीमार!तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांची माघार!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्ह्यातील २७३ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्थात बुधवारी सरपंच पदाच्या ४३0; तर सदस्य पदाच्या ८५१ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र बहुतांशी स्पष्ट झाले असून, रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांकडून प्रचार कार्यास वेग दिला जाणार आहे.आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक  ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा त्यात समावेश आहे. दरम्यान, २२ सप्टेंबरला झालेल्या छाननी प्रक्रियेत एकूण १0४ अर्ज बाद झाल्यानंतर ६0५८ अर्ज कायम होते. त्यापैकी बुधवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी  वाशिम तालुक्यातील सरपंच पदाच्या ९४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २0२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. सदस्य पदाच्या २२४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ७१५ उमेदवार कायम आहेत. मानोरा तालुक्यात सरपंच पदाकरिता दाखल १८५ अर्जांपैकी ५0 जणांनी माघार घेतली; तर सदस्य पदासाठी दाखल ६५९ अर्जांपैकी ९0 उमेदवार माघारी फिरले. कारंजा तालुक्यात सरपंच पदाच्या २३७ पैकी ५६ जणांनी माघार घेतली असून, सदस्य पदाच्या ७३९ उमेदवारांपैकी ७३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. मालेगाव तालुक्यात सरपंच पदाच्या २४२ पैकी ८७; तर सदस्य पदाच्या ८२२ पैकी १६८ जणांनी माघार घेतली. रिसोड तालुक्यात सरपंच पदाच्या २00 अर्जांपैकी ६४ आणि सदस्य पदाच्या ७९९ अर्जांपैकी १६७ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे; तर मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदाच्या ७९; तर सदस्य पदाच्या १२९ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली. दरम्यान, वाशिम तालुक्यातील सुराळा, साखरा, सोंडा या तीन ग्रामपंचायती अविरोध झाल्या असून, नागठाणा येथील सरपंच पदाची देखील अविरोध निवड झाली. मानोरा तालुक्यातील हातना, रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल, किनखेडा या ग्रामपंचायती अविरोध झाल्या; तर कारंजा तालुक्यातील लोहगाव, तारखेडा, वडगाव इजारा या ग्राम पंचायतींची निवडणूक अविरोध झाली असून ढंगारखेड, धनज खुर्द, धोत्रा जहागीर, पिंपळगाव, दादगाव, ब्राम्हणवाडा या सहा ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाचे सर्व उमेदवार अविरोध निवडण्यात आले. संबंधित ग्रामपंचायतीत आता केवळ सरपंचाची निवडणूक होत आहे.