शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय दूध भुकटी योजनेचा होणार विकास!

By admin | Updated: December 26, 2014 01:27 IST

उपसचिवांनी केले सर्वेक्षण; तीन कोटींचा प्रस्ताव पाठविणार.

अकोला : अकोल्याच्या शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचा विकास होण्याचे संकेत असून, राज्याच्या दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या उपसचिवांनी बुधवार, २४ डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे सर्वेक्षण केल्याने या कामाला गती आली आहे. या पार्श्‍वभूमीवर या योजनेच्या विकासासाठी येथील अधिकार्‍यांनी तीन कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. शासकीय दुग्ध योजनेला लागलेली घरघर याबाबत विविध मंडळांच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ह्यलोकमतह्णने प्रकाश टाकला होता. देशातच नव्हे, तर परदेशात ख्याती मिळवलेला अकोला शासकीय दूध योजनेतील भुकटी प्रकल्प गत सहा वर्षांपासून ठप्प पडला आहे. दीड लाख लीटर दुधाची भुकटी तयार करणारी येथील यंत्रसामग्री सद्य:स्थितीत गंजली आहे. या शासकीय दूध योजनेत सन १९८८ पासून दूध भुकटी प्रकल्पाला सुरुवात झाली होती. त्यावेळी अमरावती विभागातून जवळपास ७0 हजार लीटर दुधाचा पुरवठा या योजनेला होत होता. उर्वरित दूध मराठवाड्यातून आणून त्याची भुकटी तयार करण्यात येत होती. येथे निर्मित दज्रेदार दूध भुकटीला अनेक प्रांतांमध्ये मागणी तर होतीच, शिवाय परेदशातही या दूध भुकटीची निर्यात करण्यात येत होती; परंतु पश्‍चिम महाराष्ट्रात खासगी दूध डेअरी आणि खासगी भुकटी प्रकल्प सुरू झाल्याने या योजनेला तेथून दुधाचा पुरवठा कमी झाला. परिणामी हा प्रकल्प २00८ मध्ये तो बंद पडला. तीन वर्षांपूर्वी या योजनेतील बॉयलर भंगारात विकण्यात आले आहे. बॉयलर तोडून विकण्याच्या नियमाकडे कानाडोळा करून ते येथून यथास्थिती हलविण्यात आले. इतर यंत्रे हलविण्यावची तयारी करण्यात आली होती. तथापि ह्यलोकमतह्णने या प्रकरणाला वाचा फोडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर येथून नेण्यासाठी काढलेली यंत्रे पुन्हा बसविण्यात आली आहेत. भुकटी प्रकल्पाचे सर्वेक्षण दुग्धव्यवसाय, पशुसंर्वधन विभागाच्या उपसचिवांनी केले असून, परेदशात निर्यात होणारे उत्पादन देणारा राज्यातील सर्वांत मोठा हा दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू व्हावा, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तीन कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असल्याचे शासकीय दूध योजनेचे महाव्यवस्थापक एन. एस. कदम यांनी सांगीतले.