शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांसाठी शुभ वार्ता...  एकही बाधीत नाही; १८ पैकी १६ रुग्ण ‘निगेटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:38 IST

१८ रुग्णांपैकी १६ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

ठळक मुद्दे नवीन रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला नाही.महानगरांमधून आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना ‘होम क्वारंटीन’ केले आहे.

अकोला : कोरोनाच्या संशयावरून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या १८ रुग्णांपैकी १६ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. दोन रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. अकोलेकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी ‘होम क्वारंटीन’ केलेल्या रुग्णांनी आणि सोशल डिस्टन्सींगसाठी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन झाल्यास कोरोनाचे भीषण संकट अकोलेकरांवर कोसळणार आहे. सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या दोन संशयित रुग्णांपैकी एका रुग्णावर आयसोलेशन कक्षात, तर दुसऱ्या रुग्णाला अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.आतापर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे अशा संशयित रुग्णांनाच आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते; परंतु आता संसर्गातूनही आजारी पडणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी एकही नवीन रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला नाही; मात्र सध्या जिल्हाभरातील विविध गावांमध्ये मुंबई, पुणे व इतर महानगरांमधून आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना ‘होम क्वारंटीन’ केले आहे. त्यांनी कुणाशीही संपर्क करू नये, अशा सूचना आहेत. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी तपासणी करावी तसेच कोणीही आपल्याकडे आलेला पाहुणा लपवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या