शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीसाठी गोशाळांमधे निर्मित गोव-यांचा वापर करावा!

By admin | Updated: December 17, 2015 02:55 IST

व्हाईट कोलऐवजी गोव-यांचा अंत्यविधीकरिता उपयोग व्हावा; जावाहरिप्रिया गौशाळेची अकोला मनपा आयुक्तांकडे मागणी.

अकोला: अंत्यविधीकरिता लागणार्‍या लाकडासाठी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड केली जाते. लाकडास पर्याय म्हणून स्मशानांमध्ये अंत्यविधीकरिता व्हाईट कोलचा वापर केला जात आहे. मात्र, व्हाईट कोलऐवजी शहरातील गोसेवा केंद्रांमधे गायीच्या शेणापासून निर्मित गवर्‍यांचा उपयोग अंत्यविधीकरिता केला जावा, अशी मागणी हरिप्रिया गौशाळेचे अध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांना निवेदनाद्वारे केली आहे. पर्यावरण संवर्धनाकरिता व्हाइट कोलचा वापर हा अतिशय स्तुत्य उपक्रम असला तरी, जनावरांना लागणार्‍या चार्‍यापासून त्याची निर्मिती केली जाते. अल्पवृष्टीमुळे यंदाच्या उन्हाळय़ात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र जाणवणार आहेत. एन उन्हाळय़ात जिल्हय़ात चाराटंचाई निर्माण होऊ नये याकरिता व्हाइट कोलच्या निर्मितीवर त्वरित निर्बंध आणण्याची मागणी डॉ. उटांगळे यांनी मनपा आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात केली आहे. व्हाइट कोल तयार करणारे कारखानदार शेतकर्‍यांकडून जादा दराने चारा खरेदी करीत असून, आर्थिक गरज भागविण्यासाठी जिल्हय़ातील शेतकरी त्यांच्या शेतातील कडबा-कुटार या कारखानदारांना विकत असल्याचे चित्र आहे. व्हाइट कोल निर्मितीकरिता औद्योगिक परिसरात जाणारे जनावरांचे हे खाद्य अकोल्यात सात ठिकाणी असलेल्या गोशाळांकडे वळविल्यास, येत्या उन्हाळय़ात अकोला जिल्हय़ात चारा डेपो निर्माण करण्याची गरज भासणार नाही. या माध्यमातून शहरातील गोशाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात गायीच्या शेणापासून तयार केल्या जाणार्‍या गोवर्‍यांचा वापर अंत्यविधीसाठी केला जाऊ शकतो. अंत्यविधीकरिता व्हाइट कोलऐवजी गोवर्‍यांचा वापर करणे ही बाबदेखील पर्यावरणपुरकच असल्याने, उन्हाळय़ापूर्वीच याबाबत योग्य तो निर्णय घेऊन उपाययोजना करण्याची मागणी डॉ. सतीश उटांगळे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. याबाबत अधिक विचारणा करण्यासाठी डॉ. उटांगळे यांच्याशी संपर्क साधला असता, या पर्यावरणपुरक उपक्रमास हातभार लावण्यास अकोल्यातील सात गोसेवा केंद्र तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.