शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी; तणाव

By admin | Updated: July 5, 2017 00:50 IST

तक्रार घेण्यास टाळाटाळ: मध्यरात्री ‘एसपीं’नी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा शहरात राहणाऱ्या एका तरुणीला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने, तसेच काल रात्री अचानक त्या तरुणीवर हल्ला करून लोखंडी वस्तू हातावर मारून जखमी केले. याबाबत पो.स्टे.ला तक्रार देण्याकरिता सदर युवती गेली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने सदर युवतीने थेट पोलीस अधीक्षक यांना फोनवरून आपबिती सांगितली. त्यावरून पोलीस अधीक्षक राजेश कलासागर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तेल्हारा पोलीस स्टेशनला पाठविले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.स्थानिक योगेश्वर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला ‘तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकणार’, अशी धमकी तीन ते चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून मिळाली होती. ही बाब सदर युवतीने घरच्यांना सांगितली होती. तथापि, तिच्या घरच्यांनी सदर बाब एवढी मनावर न घेता त्याकडे दुर्लक्ष केले होते; मात्र ३ जुलैच्या रात्री सदर युवती घरच्या कामानिमित्त स्कुटीने शेगाव नाका येथे जात असताना युवतीच्या मागून टू-व्हीलरवरून आलेल्या दोन युवकांनी लोखंडी वस्तूने तिच्या हातावर वार केला. या हल्ल्यात सदर युवती जखमी झाली. सदर बाब घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांसोबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आली असता ती घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. उद्या सकाळी या, सकाळी बघू, असे उत्तर मिळाले. यामुळे सदर युवतीने थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. पोलीस अधीक्षक कलासागर यांनी तत्काळ दखल घेत संबंधित ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांनी मध्यरात्री तेल्हारा पोलीस स्टेशनला येऊन घटनेचे गांभीर्य जाणून घेतले. त्यानंतर सदर घटनेबाबत दोन अनोळखी युवकांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या ३५४ (ड), ३२३, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोमवारी मध्यरात्री तेल्हारा शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या शहरामध्ये विनयभंगाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून, पोलिसांचा वचक नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.