शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासंबंधी तक्रारी करा आता ऑनलाईन !

By admin | Updated: December 25, 2014 23:41 IST

शिक्षण विभागाचा उपक्रम.

अकोला : शाळांच्या संदर्भात पालकांच्या विविध तक्रारी असतात परंतु या तक्रारी कुठे कराव्या याची माहिती नसते. त्यामुळेच पालकांना तक्रार करणे सोपे जावे, यासाठी आता ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. येत्या एक महिन्यात ही यंत्रणा उभी केली जाणार आहे. शाळांकडून मनमानी पद्धतीने केली जाणारी शुल्कवाढ, शाळेत प्रवेश देण्यासाठी मागितली जाणारी कागदपत्रे, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश देताना केली जाणारी टाळाटाळ यासह शिक्षण विभागाशी संबंधित अनेक तक्रारी पालकांच्या असतात. शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून बेकायदेशीरपणे शुल्कवाढ केली जाते. त्यामुळे पालकांची पिळवणूक होते. शुल्क भरले नाही तर मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांंच्या मुलाखती घेता येत नाहीत. तसेच कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांंकडे आधारकार्ड, आरोग्य प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची सक्ती करता येत नाही. त्यासाठी शाळा प्रशासनाकडून पालकांवर दबाव आणला जातो. त्यातच अलीकडच्या काळात शाळांमध्ये स्कूलबस चालक व वाहकाकडून बालकांवर लैंगिक अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटना टाळण्यासाठी एखाद्या शाळेकडून योग्य पाऊले उचलले जात नसेल तर कोणाशी संपर्क साधावा, यासंदर्भात पालकांना कोणतीही माहिती नसते. शिक्षणविषयक तक्रारी नोंदविण्यासाठी शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक दिलेले नाहीत. महापालिका, जिल्हा परिषद तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्या शाळा येतात याची देखील माहिती नसते. याची माहिती देणारी यंत्रणा देखील उभी केली जाणार आहे. सोबतच शिक्षक विषयक तक्रारींसाठी ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला आहे. येत्या एक महिन्यात ही यंत्रणा उभी केली जाणार आहे.शिक्षण क्षेत्रातील तक्रारी संदर्भात पालकांना तक्रार करणे सोपे जावे यासाठी लवकरच ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा उभी केली जाणार आहे. यामुळे शिक्षण विभागातील तक्रारींचा निपटारा करणे सोपे जाईल, असे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.