शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी महिलांची टोळी तांबे-पितळचे भांडे घेऊन पसार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

तांबे व पितळचे भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहे. ग्रामीण भागात अशा तांब्या, पितळाचे भांडे पारंपरिकरीत्या जोपासून ठेवले जातात. याच ...

तांबे व पितळचे भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहे. ग्रामीण भागात अशा तांब्या, पितळाचे भांडे पारंपरिकरीत्या जोपासून ठेवले जातात. याच पारंपरिक ठेव्यावर अज्ञात महिलांच्या टोळीने आलेगावमध्ये अगदी राजरोसपणे डल्ला मारल्याचे बोलले जाते. या भांड्यांना पुन्हा चमकविणे सहज सोपे नसते. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन हे भांडे चमकवून नवे करून देण्याच्या नावाखाली अज्ञात महिलांनी गावातून भांडे गोळा केले. सोबतच काही कुकरसुद्धा दुरुस्तीसाठी जमा केले. तीन लिटरच्या कुकरला पाच लिटरमध्ये बदलवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. भांडे चमकण्यासाठी आणि कुकर दुरुस्त करण्यासाठी गावातील महिलांकडून पैसेसुद्धा घेण्यात आले. भांडे आणि पैसे घेऊन गेलेल्या अनोळखी महिला पुन्हा गावात फिरकल्या नाहीत किंवा कोणालाही दिसल्या नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आता गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने या महिलांच्या टोळीचा गावकरी शोध घेत आहेत.

तांब्या पितळाचे भांडे चमकविणे हा आमचा व्यवसाय असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरातील भांडे दिले. पण, त्या महिला परत आल्याच नाहीत.

- ज्योती दत्तात्रय काळदाते

त्या महिलांच्या बोलण्यावरून भांड्यांचा त्यांचा मूळ व्यवसाय असावा असे वाटले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता आमचे भांडेही गेले आणि पैसेही गेले.

- उमाबाई गजानन मुर्तडकर

आलेगावमधून या प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही, अथवा याबाबत कोणी माहितीही दिली नाही. तरी नागरिकांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून काही देऊ नये व सावध राहावे.

- राहुल वाघ, ठाणेदार, चान्नी पोलीस स्टेशन