शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप कायम राहणे आवश्यक!

By admin | Updated: September 3, 2015 01:55 IST

प्रशासनाकडून नियमांचा बडगा नको; जाचक अटी शिथिल करा!

अकोला : गणेशोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने ठरवून दिलेले नियम व अटी हितकारक आहेत. मात्र, या नियमांच्या आडून लादल्या जात असलेल्या अटी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार्‍यांसाठी जाचक ठरत आहेत. उत्सवाचे पावित्र राखण्यासाठी सार्वजनिक स्वरूप नक्कीच जतन केलं जाईल. मात्र, आडमुठे धोरण न स्वीकारता प्रशासनानेदेखील नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी दोन पावले पुढे आले पाहिजे, असा सूर बुधवारी दुपारी ह्यसार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरूपह्ण या विषयावर ह्यलोकमतह्ण शहर कार्यालयात पार पडलेल्या परिचर्चेत उमटला. या परिचर्चेत १२३ वर्षांची परंपरा लाभलेल्या अकोल्यातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तथा सामाजिक जाणिवेतून गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बाप्पाचे येत्या १७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. अकोल्यातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हजारो गणेशोत्सव मंडळे दरवर्षी हा सण साजरा करतात. स्वतंत्र्यासाठी देशवासीयांनी किमान धार्मिक भावनेतून तरी एकत्रित यावे, या जाणिवेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली होती. काळानुरूप हा उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली. सनई-चौघड्यांची जागा ह्यहायटेक डीजे सिस्टीमने घेतली, शाडू मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीं आल्या. देशातील उत्सवांवर ह्यचायना मेडह्ण वस्तूंनी ताबा मिळविला आहे. लोकसंख्या वाढल्याने या सणाचा उत्साह प्रत्येक चौका-चौकांत आणि गल्ली बोळय़ांमध्ये दिसून येतो. प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांकरिता अनेक नियम व अटी तयार केल्या आहेत. ज्यात रात्री दहानंतर लाऊडस्पिकर वाजवू नये, किमान १२ फूट अंतर ठेवून मंडळाने मंडप उभारावा, विसर्जन मिरवणूक रात्री १२ पूर्वीच संपवावी. उत्सवादरम्यान निर्माण होणारी जातीय तेढ, भेदभाव व तंटे रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने तयार केलेले नियम गणेशोत्सव मंडळांकरिता जाचक सिद्ध ठरत आहेत. गेल्या काही वर्षांचे अनुभव लक्षात घेता उत्सवादरम्यान व मिरवणुकीदरम्यान शासनाच्या अटी व नियम मंडळांकरिता जाचक सिद्ध ठरत आहेत. गणेशोत्सवाचं सार्वजनिक स्वरूप कायद्याच्या चौकटीत राहून जतन केलं जाईल. मात्र, त्यासाठी प्रशासनाने आडमुठे धोरण सोडावे व नियमांमध्ये शिथिलता आणावी, असा सूर परिचर्चेत उमटला.