शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाºयांच्या अहवालावर ठरेल शिक्षकांचे भवितव्य !

By admin | Updated: March 19, 2017 19:49 IST

जिल्ह्यातील ४७ शिक्षकांच्या पदांना दिलेली मान्यता नियमानुसार आहे की नाही. याची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांच्याकडून शिक्षकांची सुनावणी करण्यात येत आहे.

बंदी काळातील शिक्षक भरती: अहवालावरून शिक्षण आयुक्त घेणार निर्णयअकोला: शिक्षक भरती बंदी काळामध्ये तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी अनेक शाळेतील शिक्षक पदांना मान्यता देवुन त्यांना जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये रूजु केले. यात मोठी आर्थिक देवाणघेवाण सुद्धा झाली. जिल्ह्यातील ४७ शिक्षकांच्या पदांना दिलेली मान्यता नियमानुसार आहे की नाही. याची तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांच्याकडून शिक्षकांची सुनावणी करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या अहवालावर बंदीकाळात भरती झालेल्या शिक्षकांचे भवितव्य ठरणार आहे. शासनाने शिक्षक भरती करण्यास बंदी घातली असतानाही जिल्ह्यामध्ये तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून अनेक शाळांमध्ये शिक्षक पदांना मान्यता दिली आणि शिक्षक भरती करून घेतली. भरती बंदीकाळातही आर्थिक लाभ करून घेण्याच्या दृष्टीकोनातुन तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थांकडुन प्राप्त नियमबाह्य वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मंजुर करून शिक्षक पदांना मान्यता देण्याचा पराक्रम केला आणि अनेक शाळांमध्ये शिक्षकांना रूजु करून घेतले. परंतु ही बाब शासनाच्या लक्षात आल्यामुळे शासनाने यासंदर्भात चौकशी करून योग्य निर्णय घेण्यास शिक्षण विभागाला बजावले. सद्यस्थितीत भरती बंदीकाळात नोकरीवर लागलेले ४७ शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या पदांना दिलेली मान्यता नियमानुसार आहे की नियमबाह्य आहे. याची तपासणी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी सुरू केली आहे. त्यामुळे या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. भरती बंदी काळात नोकरीवर लागलेल्या शिक्षकांची पदांची मान्यता नियमानुसार असेल तर त्यांची नोकरी कायम राहील. अन्यथा त्यांना शिक्षक पदावरून दुर व्हावी लागेल. अशी भिती व्यक्त करण्यात येत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सुनावणीनंतर कोणत्या शिक्षकाचा आक्षेप असेल तर त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे होणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सुनावणीमुळे ४७ शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार लटकत आहे.