शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...
3
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड
4
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
5
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
6
'सैयारा'चा अहान पांडे चेन स्मोकर होता? युट्यूबरने केली पोलखोल; म्हणाला, "वर्कशॉपवेळी तर..."
7
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
8
'मुरांबा'मध्ये एन्ट्री केलेल्या 'या' चिमुकलीने हिंदीतही केलंय काम, ओळखलंत का?
9
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
10
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
11
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
12
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
13
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
14
पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय
15
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
16
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
17
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
18
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
19
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
20
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

सिंचन प्रकल्पांच्या निधीत चाळीस टक्के कपात!

By admin | Updated: March 12, 2015 01:42 IST

आता लक्ष अर्थसंकल्पाकडे

राजरत्न सिरसाट /अकोला: सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाकरिता सुधारित प्रशासकीय आणि मान्यता मागणीनुसार निधी मिळाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम असतानाच शासनाने यावर्षी सिंचन प्रकल्पावरील बांधकामाच्या निधीत ४0 टक्के कपात केल्याने काम करणार्‍या यंत्रणाची प्रचंड कोंडी झाली आहे. अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, उमा, कवठा बॅरेज, बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव व इतर रखडलेल्या प्रकल्पांच्या कामासाठी निधीची गरज असल्याचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील तरतुदीकडे अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने आजमितीस २ लाख ४७ हजार हेक्टर सिंचन अनुशेष कायम आहे. बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव या मेगा प्रकल्पाच्या कामासाठी आर्थिक रसद कमी पडत असून, अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, काटेपूर्णा, घुंगशी, उमा बॅरेजेस या कामांना पूरक निधी नसल्याने कामांची गती खुंटली आहे. काटीपाटी, कंचनपूर हे प्रकल्पही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. अमरावती जिल्हय़ातील अप्पर वर्धा प्रकल्पाची पाटचार्‍याची कामे रखडली आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार पश्‍चिम विदर्भातील १0२ प्रकल्प अनुशेष कार्यक्रमात टाकली आहेत. अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्राहक, आकोट तालुक्यातील पोपटखेडा -२, या दोन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली; पण निधीची पूर्तता झाली नसल्याने या कामांना विलंब होत आहे. बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव हा खारपाणपट्टय़ातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या पाण्याचा शेवट खारपाणपट्टय़ात म्हणजे अकोला तालुक्यात राहणार असल्याने, या भागातील नागरिक, शेतकर्‍यांना गोडे पाणी मिळणार आहे; पण या प्रकल्पाच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या २९५ कोटी निधीपैकी ४0 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाची गती खुंटणार आहे