शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

विंधन विहिरी, कूपनलिकांना संजीवनी!

By admin | Updated: August 17, 2014 01:50 IST

अमरावती विभागात १५३ कामे प्रस्तावित

संतोष येलकर /अकोलाबंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या विंधन विहीरी आणि कुपनलिकांकडे पाण्याचे झरे वळवून, भूजल पातळी वाढविण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १५३ जलभंजनाची (हायड्रो फॅक्चरिंग) कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. जलभंजन यंत्राव्दारे ही कामं सुरूही झाली आहेत.पाऊस कमी होत असल्याने दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होत आहे. भूजल पातळी खोल जात असल्याने, विंधन विहिरी (बोअर) आणि कुपनलिका (ट्युबवेल) बंद पडत आहेत. बंद पडणार्‍या बोअरच्या दिशेने परिसरातील पाण्याचे झरे वळवून, या बोअर्स जिवंत करण्यासाठी जलभंजन केले जाते. जलभंजन (हायड्रो फॅक्चरिंग) यंत्राव्दारे हवा व पाण्याच्या दाबाने बोअरचे पुनरुज्जीवन करुन पाण्याची उत्पादकता वाढविली जाते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये १५३ बोअर्सच्या जलभंजनाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या काही ठिकाणी जलभंजनाच्या कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. १४ ऑगस्टपर्यंंत अकोला जिल्ह्यात ३ बोअर्सच्या जलभंजनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, बंद पडणार्‍या बोअर्सचे जलभंजनाच्या कामातून पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जलभंजनाची विभागातील प्रस्तावित कामे!जिल्हा               कामेअमरावती             ४0अकोला                 ४८वाशिम                  २५बुलडाणा                ३0यवतमाळ              १0 एकूण                  १५३